Crop Insurance: पिक विमा योजनेतून ‘हे’ शेतकरी अपात्र! काय आहे कारण? वाचा सविस्तर..


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Crop Insurance: राज्यातील करोडो शेतकरी पिक विमा योजनेसाठी अर्ज करत असतात. जेणेकरून भविष्यात निसर्गाच्या आपत्तीमुळे किंवा इतर कोणत्या कारणामुळे शेती पिकाच्या नुकसान झाले तर विम्यातून आपली नुकसान भरपाई मिळेल. सरकारने सुरू केलेल्या एक रुपयात पिक विमा योजनेचा लाभ घेता यावा यासाठी शेतकरी सीएससी केंद्रात जाऊन आपल्या पिकांचा विमा काढतात. सोलापूर जिल्ह्यातल्या लाखो शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पीकविमा योजना भरताना काय विचार केला असेल? “अवघा एक रुपया भरायचाय, भरून टाकू… निदान नुकसान झालं तर काही तरी हातात येईल!” पण हाच एक रुपया आज त्यांच्या फसवणुकीचं कारण ठरत आहे. कारण तब्बल चार लाख नव्वद नऊ हजार शेतकऱ्यांना एक दमडीही मंजूर झालेली नाही.

हे पण वाचा | या तारखेपर्यंत महाराष्ट्रात पाऊस धुमाकूळ घालणार, पंजाबराव यांचा शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा..

राज्य सरकार म्हणालं, “शेतकऱ्यांनी फक्त एक रुपया द्या, उरलेलं आम्ही देतो.” सरकारने त्यांचा हिस्सा दिला, शेतकऱ्यांनीही विश्वास ठेवून अर्ज भरले. एक-एक रुपया जमा होत गेला आणि सात लाख शेतकऱ्यांनी विमा घेतला. पण आता हिवाळा उजाडला तरी पाच लाख शेतकरी अजूनही ‘अपात्र’ म्हणून विम्याच्या रांगेबाहेर उभे दिसत आहेत. या शेतकऱ्यांना पिक विमा योजनेतून अपात्र का ठरवलं गेलं याबद्दल कोणतीही माहिती विमा कंपनीकडून किंवा सरकारकडून देण्यात आलेली नाही.

मंजुरी असूनही रक्कम मिळत नाही…

काही निवडक २ लाख ३९ हजार शेतकऱ्यांना २७९ कोटींची नुकसानभरपाई मंजूर झाली आहे, पण त्यातलीही ८२ कोटींची रक्कम ७३ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात अडकली आहे. मंजुरी आहे, आदेश आहेत, जिल्हाधिकाऱ्यांचं पत्र आहे, पालकमंत्र्यांनीही पाठपुरावा केला, पण पैसे अजूनही ‘वेटिंग’वर आहेत. Crop Insurance

हे पण वाचा | पोस्ट ऑफिस च्या ‘या’ योजनेतून फक्त व्याजातूनच मिळणार 3 लाख रुपये नफा! कशी करावी गुंतवणूक? जाणून घ्या सविस्तर

विमा आहे की सट्टा?

काय या योजनांचा उपयोग जर नुकसान होऊनही पैसे मिळायचेच नाहीत? शेतकऱ्यांच्या नावावर जमा झालेली कोट्यवधींची संरक्षित रक्कम (2081 कोटी) कशासाठी? तालुक्याप्रमाणे कोट्यवधींची आकडेमोड झालीय, पण पैसा मात्र शेतकऱ्याच्या हातात नाही. पिक विमा काढून देखील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचा पिक विमा मिळाला नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता दिसत आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची रक्कम मिळत नसल्यामुळे शेतकरी सरकारवर नाराज असल्याचे चित्र दिसत आहे.

अपात्र कशासाठी?

पाच लाख शेतकरी अचानक ‘अपात्र’ ठरवले गेले. कोणत्या निकषावर? कोणत्या आधारावर? या प्रश्नांचं उत्तर विमा कंपनीने अजूनही दिलेलं नाही. म्हणजे ज्यांनी विश्वासाने अर्ज केला, त्यांना आता फक्त निराशा पदरात पडली आहे. हे शेतकरी या योजनेतून अपात्र का झाले आहेत याबद्दल कोणताही कारण समोर आलं नाही. Crop Insurance

हे पण वाचा | तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! तुरीच्या दरात मोठी वाढ; पहा आजचे तुरीचे दर

शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न उपस्थित

या संपूर्ण प्रकारात शेतकऱ्याच्या भावनांची, मेहनतीची आणि विश्वासाची थट्टा झाली आहे. एकीकडे अवकाळी पाऊस, दुसरीकडे बाजारात भाव पडलेले, त्यात पीकपद्धतीची अनिश्चितता… आणि आता पिक विमा देखील घोटाळा, आधीच निसर्गाने ऐनवेळी सुरू केलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान होत आहे त्याचबरोबर आता पिकाचा काढलेला विमा देखील शेतकऱ्यांना मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या वाढत चालल्या आहेत.

सरकारकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे उत्तर अपेक्षित आहे. कारण शेतकरी हा फक्त मतांचा विषय राहू नये. त्याच्या आयुष्याचा, कष्टाचा, आणि भावनांचा विचार करणं गरजेचं आहे. योजना फसवणुकीसारख्या वाटायला लागल्या, तर हा देश कसा उभा राहील? एक रुपयाच्या विश्वासावर न उभं राहिलेलं सरकार, कोटींच्या योजनांचं काय करणार? शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळावेत.

हे पण वाचा | मोठी बातमी! पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता या तारखेला होणार जमा?  हे शेतकरी होणारा अपात्र 

तालुक्याचे नावसहभागी शेतकरीमंजूर शेतकरीमंजूर रक्कम (कोटी)
अक्कलकोट१००९१२ ३८३९७ ४३ 
बार्शी११५७५२ ८९९९० ११४ 
करमाळा१०४३९७ १२६७९ ०.९ 
माढा१०६५०९ २२८०० १४ 
माळशिरस४२३४५ १५२८ १.४१ 
मंगळवेढा६३१०१ २७०३९ १४.२८ 
मोहोळ३०७६ ७८५६ २२ 
पंढरपूर९४०५ ९५१ २.२८ 
सांगोला८७४३७ ३२१० ५.४८ 
उ. सोलापूर२३२२८ १२५१९ ३५ 
द. सोलापूर५४३३३ २०४४४ १८.३७ 
एकूण७३८१८३ २३८९०३ २७९ 

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या whatsapp ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “Crop Insurance: पिक विमा योजनेतून ‘हे’ शेतकरी अपात्र! काय आहे कारण? वाचा सविस्तर..”

Leave a Comment