weather update tomorrow : महाराष्ट्रात मागील चार दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली असून, कोकण किनारपट्टी, मुंबई आणि उपनगरांत येत्या 36 तासांत अतिवृष्टी होण्याचा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने दिला आहे. हवामान केंद्राच्या प्रमुख शुभांगी भुते यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील काही दिवस राज्यभर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.weather update tomorrow
हे पण वाचा : Maharashtra Weather Alert: राज्यात सध्या पावसाचा धुमाकूळ; तर या तारखेला मान्सून महाराष्ट्रात होतोय दाखल
अरबी समुद्रात सक्रिय कमी दाबाचे क्षेत्र वाढला पावसाचा जोर
अरबी समुद्रात सध्या कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, ते अधिक तीव्र होऊन उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रावर होणार असून, पुढील 36 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. समुद्रातील स्थिती पाहता मच्छिमारांना पुढील चार दिवस म्हणजे 25 मेपर्यंत समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
मुंबईसह अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि रेड अलर्ट
मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नगर, संभाजीनगर (छत्रपती), नाशिक आणि सिंधुदुर्ग यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हवामान खात्याने वाऱ्याचा वेग काही ठिकाणी 60 किमी प्रतितासापर्यंत जाऊ शकतो, असे सांगितले आहे.
हे पण वाचा : Panjabrao Dakh: या तारखेपर्यंत महाराष्ट्रात पाऊस धुमाकूळ घालणार, पंजाबराव यांचा शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा..
अलर्टचा तपशील पुढीलप्रमाणे:
22 मे: रत्नागिरी – रेड अलर्ट, मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्हे – ऑरेंज अलर्ट
23 मे: रायगड, रत्नागिरी – रेड अलर्ट, मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नाशिक – ऑरेंज अलर्ट
24-25 मे: कोकण किनारपट्टी – ऑरेंज अलर्ट, उर्वरित राज्य – यलो अलर्ट
‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका हवामान खात्याची विशेष सूचना
अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ‘शक्ती’ या चक्रीवादळाचा संभाव्य धोका निर्माण झाल्याचे हवामान विभागाने नमूद केले आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव रत्नागिरी, सातारा आणि कोकण किनारपट्टीवर अधिक जाणवण्याची शक्यता आहे. साताऱ्यातील घाट परिसरात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत. मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हे पण वाचा : Panjabrao Dakh: या तारखेपर्यंत महाराष्ट्रात पाऊस धुमाकूळ घालणार, पंजाबराव यांचा शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा..
कोकण, घाटमाथा आणि मराठवाड्यात पावसाचा जोर
कोकणसह मध्य महाराष्ट्रात पावसाने जोर धरला आहे. ठाण्यात आजपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे, तर मुंबई आणि पालघरमध्ये उद्यापासून अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये 25 मेपर्यंत मुसळधार पाऊस कायम राहणार आहे. सिंधुदुर्गात सलग पाच दिवस अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
पुणे, सातारा, अहिल्यानगर (जुने नगर) आणि कोल्हापूरच्या घाट परिसरात दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यात परभणी, बीड, नांदेड आणि लातूर येथेही मुसळधार पावसाची शक्यता आहे.
50-60 किमी प्रतितास वाऱ्यांचा धोका सावधगिरी बाळगा
हवामान विभागाने नागरिकांना जोरदार वाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः सखल भागात पाणी साचण्याचा, कमकुवत झाडे व वीजेच्या तारांवर परिणाम होण्याचा धोका आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हे पण वाचा : Panjabrao Dakh: या तारखेपर्यंत महाराष्ट्रात पाऊस धुमाकूळ घालणार, पंजाबराव यांचा शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा..
मान्सूनसाठी तयार होत आहे अनुकूल वातावरण
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, केरळमध्ये पुढील 2-3 दिवसांत नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन होण्यास अनुकूल वातावरण तयार झाले आहे. पूर्वमध्य अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. यामुळे कोकण, गोवा, कर्नाटक आणि केरळमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. याचाच अर्थ लवकरच महाराष्ट्रातही मान्सूनची औपचारिक एंट्री होऊ शकते.
आशियात नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा