दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅबलेट; अर्ज कसा करायचा व शेवटची तारीख किती? पहा सविस्तर..


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Free Tablet Scheme: दहावीचा निकाल लागल्यानंतर अनेक घरांमध्ये आता शिक्षणाची नव्याने आखणी सुरू झाली आहे. कुठे आईवडील मुलाच्या गुणांवर आनंदी आहेत, तर कुठे थोडी नाराजी असली तरी ‘पुढच्या टप्प्यावर काहीतरी चांगलं घडावं’ यासाठी सगळेच झटत आहेत. आणि अशातच एक आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे मोफत टॅबलेट योजना. होय, महाराष्ट्र शासनाच्या महाज्योती योजनेअंतर्गत आता दहावी उत्तीर्ण झालेल्या काही विशिष्ट विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट आणि इंटरनेट सुविधा दिली जाणार आहे. या योजनेचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. ग्रामीण, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागास प्रवर्गातील हुशार विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षांसाठी तयार व्हावं आणि मोठ्या संधी मिळवाव्यात.

हे पण वाचा | सोनं स्वस्त, चांदी महागली! बाजारात मोठा बदल खरेदीआधी नक्की वाचा हे दर

योजना कोणासाठी आहे?

ही योजना फक्त महाराष्ट्र राज्यातील रहिवासी आणि इतर मागासवर्गीय (OBC), विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आहे. महत्त्वाचं म्हणजे, नॉन क्रिमिलेअर गटात येणाऱ्या विद्यार्थ्यांनाच याचा लाभ मिळणार आहे. 2024-25 या शैक्षणिक वर्षात दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, आणि जे ११वीत विज्ञान शाखेत प्रवेश घेत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी ही योजना लागू आहे. म्हणजेच JEE, NEET, CET सारख्या स्पर्धा परीक्षा दृष्टीने तयारी करणाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

हे पण वाचा | महाडीबीटीवरील जुन्या अर्जाचं काय होणार? अर्ज पुन्हा करावा लागणार का?

काय मिळणार आहे?

या योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे –

  • मोफत टॅबलेट
  • मोफत इंटरनेट कनेक्शन
  • JEE / NEET / MHT-CET साठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण

म्हणजे, शिक्षणाची साधनं आता आपल्या घरात येणार आहेत. फक्त मोबाईलवर व्हिडिओ बघायचा नाही, तर आता अभ्यासही ऑनलाईन करता येणार आहे.

हे पण वाचा | महाडीबीटीवरील जुन्या अर्जाचं काय होणार? अर्ज पुन्हा करावा लागणार का?

लागणारी कागदपत्रं

अर्ज करताना खालील कागदपत्रांची गरज भासणार आहे:

  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र
  • दहावीचे गुणपत्रक
  • अकरावी विज्ञान शाखेतील ऍडमिशन स्लिप किंवा बोनाफाईड
  • जर विद्यार्थ्याने दिव्यांग किंवा अनाथ प्रमाणपत्र असेल, तर त्याची प्रत

हे पण वाचा | मे महिन्यात या लाडक्या बहिणींना मिळणार 3,000 रुपये; जाणून घ्या सविस्तर..

अर्ज कुठे आणि कसा करायचा?

या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2025 आहे. त्यामुळे अजूनही वेळ आहे, पण उशीर न करता लवकरात लवकर खालील वेबसाईटवर जाऊन अर्ज करा: mahajyoti.in या वेबसाईटवर आवश्यक त्या सूचनांचे पालन करून ऑनलाइन अर्ज भरता येईल. Free Tablet Scheme

दहावी झाली की अनेक घरात एकच चर्चा असते “पुढे काय?” काहींच्या हातात पैसा असतो, काहींना मार्गदर्शन, पण अनेक घरांमध्ये केवळ इच्छाशक्ती आणि मेहनत यावरच वाटचाल होते. अशा विद्यार्थ्यांसाठी ही योजना म्हणजे एक नवी आशा आहे. मोफत टॅब मिळवणं ही फक्त सुविधा नाही, तर पुढचं आयुष्य घडवण्याची संधी आहे. म्हणून, तुमच्या ओळखीच्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. कधी कधी एक शेअर एखाद्याचं आयुष्य बदलू शकतो.

  • ⏳ अर्ज करण्याची अंतिम तारीख: 31 मे 2025
  • 📍 अधिकृत वेबसाईट: mahajyoti.in

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा