Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येणार गं?” हे विचारणं आता घराघरातल्या प्रत्येक महिलांचे झालं आहे. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” ही योजना आली आणि तमाम गरीब, गरजू महिलांना एक आशेचा किरण गवसला. पण मे महिना संपायला आला तरी हप्ता मात्र अद्यापही मिळालेला नाही. त्यामुळे गावपातळीवर, शहरात सगळीकडेच संभ्रम आणि चिंता निर्माण झाली आहे. सकाळी भाजी आणायला जाताना, सायंकाळी अंगणात बसून गप्पा मारताना, शेजाऱ्यांची हाक ऐकली की विषय एकच मे महिन्याचा हप्ता कधी येणार.
हे पण वाचा | अवकाळी पावसाचा कांद्याला फटका! लवकरच भाववाढीची शक्यता; जाणून घ्या सविस्तर…
राज्य सरकारचं ताजं अपडेट एकत्र येणार दोन्ही महिन्याचे हप्ते?
राज्य सरकारकडून दिलेल्या माहितीनुसार, ज्या महिलांना एप्रिल महिन्याचे पैसे मिळाले नाही त्या महिलांना एप्रिल व मे महिन्याचे हप्ते एकत्र येण्याची शक्यता आहे. म्हणजेच महिलांच्या खात्यात थेट ३,००० रुपये जमा होऊ शकतात. मात्र, अजून यावर ठोस सरकारी घोषणा आलेली नाही. ज्या महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्या महिलांना मी आणि एप्रिल असे एकूण तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तटकरे म्हणाल्या मे संपायच्या आत हप्ता मिळणार
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की, “मे संपायच्या आत हप्ता खात्यात जमा होईल.” मात्र आता महिन्याचा शेवट आला तरी पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे पैसे मिळण्याची शक्यता आहे. Ladki Bahin Yojana
हे पण वाचा | घरबसल्या डाऊनलोड करा आधार कार्ड! अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने; जाणून घ्या सविस्तर..
काही महिलांना मिळणार नाही पूर्ण हप्ता कारण वाचा
लाडकी बहीण योजनेतील अर्जांची सध्या काटेकोर पडताळणी सुरु आहे. २.५ लाख रुपयेपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न असणाऱ्या महिलांचे अर्ज फेटाळले जात आहेत. याशिवाय, संजय गांधी निराधार योजना किंवा नमो शेतकरी योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांना पूर्ण हप्ता मिळणार नाही.
- संजय गांधी योजनेतील महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही.
- नमो शेतकरी योजनेतील महिलांना फक्त ५०० रुपये मिळतील.
हे पण वाचा | अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात; आता पसंतीची १० कॉलेज निवडा; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
हप्ता येईल एकदाच की दोन टप्प्यांमध्ये?
जर एप्रिल आणि मे हप्ते एकत्र आले, तर एकदाच ३००० रुपये मिळणार का, की पुन्हा दोन टप्प्यांत १५०० + १५०० असे जमा होणार? यावर अजूनही सरकारने स्पष्टता दिलेली नाही. त्यामुळे महिलांनी फसव्या अफवांवर विश्वास न ठेवता, अधिकृत खात्रीशीर अपडेटची वाट पाहावी.
काय करावं महिलांनी?
- आपल्या अर्जाची स्थिती तपासून घ्या.
- उत्पन्न मर्यादेच्या अटी पूर्ण होतात का, याची खात्री करा.
- अर्ज नाकारला गेला असेल, तर आपल्या CDPO (महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी) यांच्याशी संपर्क साधा.
- हप्ता नाही मिळाला म्हणून चिंता नको थोडी वाट पाहा
हे पण वाचा | लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! या दिवशी मिळणार १५०० रुपये, तुमच्या खात्यात कधी येणार?
आज घरखर्च वाढला आहे, गॅस सिलिंडर महाग झाला आहे, औषधं, शिक्षण सगळ्याचा खर्च वाढलेला आहे. अशा परिस्थितीत हा १५०० रुपयांचा हप्ता महिलांसाठी मोठा आधार आहे. पण एप्रिलचा हप्ता वेळेवर मिळाला नाही, म्हणून निराश होण्याचं कारण नाही. सरकारनं आश्वासन दिलं आहे आणि लवकरच या गोंधळावर तोडगा निघेल. शेवटी एकच गोष्ट “लाडकी बहीण” ही योजना तुमच्यासाठी आहे, पण त्यासाठी योग्य अर्ज, अटींचं पालन आणि थोडं संयम हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. सरकारचं स्पष्टीकरण येईपर्यंत फसव्या मेसेजपासून सावध राहा आणि अधिकृत अपडेटचीच वाट पाहा.
3 thoughts on “मे महिन्यात या लाडक्या बहिणींना मिळणार 3,000 रुपये; जाणून घ्या सविस्तर..”