पंतप्रधान नरेंद्र मोदींचं शेतकऱ्यांना गिफ्ट ! KCC व्याज सवलतीचा फायदा सुरूच


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Modi gift to farmers :- दिल्लीहून मोठी बातमी आलीय. बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांसाठी दोन मोठे निर्णय घेण्यात आले. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याची घोषणा केलीय. २०२५-२६ च्या खरीप हंगामासाठी भाताचे एमएसपी म्हणजेच किमान आधारभूत किंमत ६९ रुपयांनी वाढवण्यात आली असून आता शेतकऱ्यांना १ क्विंटल भातासाठी २३६९ रुपये मिळणार आहेत. याआधी हा दर २३०० रुपये होता. म्हणजेच शेतकऱ्यांच्या हातात थेट जास्तीचा पैसा पडणार, ह्याचं स्वागतचं झालंय.

हे पण वाचा | दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅबलेट; अर्ज कसा करायचा व शेवटची तारीख किती? पहा सविस्तर..

ह्या वाढीचा अर्थ सरळ असा की, एखाद्या शेतकऱ्याने ५० क्विंटल भात विकला, तर त्याला यावर्षी ३४५० रुपये जास्त मिळतील. हे शेतकऱ्यांच्या कष्टाला दिलेलं मूल्य आहे, असं मोदी सरकारचं म्हणणं आहे.

याच बैठकीत आणखी एक महत्वाचं आणि थेट शेतकऱ्यांच्या खिशाला हात घालणारं निर्णय झाला. सुधारित व्याज अनुदान योजना (Modified Interest Subvention Scheme – MISS) पुन्हा सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली. ही योजना शेतकऱ्यांना केवळ ४% व्याजदराने २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्याची सुविधा देते. म्हणजे शेतकरी जर वेळेवर कर्ज फेडतात, तर त्यांना अतिरिक्त ३ टक्के व्याज सवलत मिळते – याला PRI (Prompt Repayment Incentive) म्हणतात. या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय.

हे पण वाचा | दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅबलेट; अर्ज कसा करायचा व शेवटची तारीख किती? पहा सविस्तर..

असंच काहीसं पशुपालन आणि मत्स्यपालनासाठी घेतल्या कर्जांवरही लागू होतं – २ लाख रुपयांपर्यंत व्याज सवलत शेतकऱ्यांना दिली जाणार आहे.

हा निर्णय एका दृष्टीनं शेतकऱ्याच्या मनात विश्वास निर्माण करणारा आहे. कारण यात केवळ एमएसपी वाढ नाही, तर त्यांच्या खेळत्या भांडवलावरचा ताण सुद्धा कमी करण्यात आला आहे. ग्रामीण भागात, जिथे पीक काढायचं आणि पुढचं काम उभं करायचं त्यासाठी कर्ज हा एकमेव आधार असतो, तिथे ही व्याज सवलत खूप मोलाची ठरते.

हे पण वाचा | तापमानात कहर! पुण्यासह ८ जिल्ह्यांना यलो अलर्ट, रखरखाटाने जीव हैराण, अवकाळी पावसाचा पण इशारा

आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे, ही योजना कुणाच्या तरी नव्या विचारातून आलेली नसून माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात सुरू करण्यात आलेली किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजना पुढे चालू ठेवण्यात आली आहे. आणि आता मोदी सरकारने त्यात नवी सवलत देत तिचा अधिक लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय.

हे पण वाचा | Weather Update: या जिल्ह्यात गारपीटीचा कहर! महाराष्ट्राच्या 15 जिल्ह्यांना अलर्ट, तुमचं गाव आहे का यादीत?

या सर्व गोष्टींचा एकत्र विचार केला तर असं दिसतंय की शेतकरी आता थोडासा हसतोय. त्याच्या मेहनतीला किंमत मिळतेय. त्याच्या कष्टाचं सरकारला भान आहे, अशी भावना त्याच्या मनात निर्माण होतेय.

 टीप : या बातमीत दिलेली माहिती विविध सरकारी स्त्रोतांवर आधारित आहे. कर्ज, व्याजदर वा एमएसपी दरांतील बदलांवर आधारित निर्णय घेण्यापूर्वी, स्थानिक कृषी कार्यालय अथवा बँकेशी संपर्क करून संपूर्ण माहिती जाणून घ्या.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment