लग्नसराईत सोने खरेदी करणाऱ्यांची चिंता वाढली! सोन्याच्या किमतीत पुन्हा वाढ; जाणून घ्या नवीन दर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price Today: लग्नसराईचे दिवस सुरू आहेत आणि अशा दागिने खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये ग्राहकांची मोठी गर्दी दिसत आहे. अशातच सोन्याचे भाव मात्र कमी होण्याचे नाव घेत नाहीयेत. लग्नाचे सीजन असल्यामुळे दागिने खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये नागरिकांची गर्दी दिसत आहे. मात्र सोन्याचे वाढलेले भाव पाहून ग्राहकांमध्ये चिंता वर्तवली जात आहे. अशातच आज सोन्याचे भाव वाढले आहेत. त्यामुळे आज जर तुम्ही सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची ठरू शकते.

मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी म्हणजेच 20 मार्च 2024 रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये 220 रुपयांची वाढ झाली असून आज दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 90810 रुपये एवढा आहे. आज 22 कॅरेट दहा ग्राम सोन्याचा दर 83 हजार 250 रुपये एवढा आहे. साधारणपणे सोन्याचे दागिने तयार करण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्याचबरोबर गुंतवणूक करण्यासाठी 24 कॅरेट सोन्यामध्ये अनेक जण गुंतवणूक करतात. 24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध सोने मानले जाते या सोन्याला बट्टा नसतो.

हे पण वाचा | राज्यातील या भागात अवकाळी पावसाची शक्यता; जाणून घ्या राज्यातील हवामान अंदाज

महाराष्ट्रातील प्रमुख शहरात आजचे सोन्याचे दर

आज मुंबई शहरामध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 83 हजार 100 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर 90660 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे. पुणे शहरामध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 83 हजार 130 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर 90690 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे. जळगाव शहरामध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 83130 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर 90690 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे.

नागपूर शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 83,130 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे तर 24 कॅरेट पाण्याचा दर 90 हजार 690 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे. अमरावती, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नाशिक या शहरांमध्ये आज 22 कॅरेट सोन्याचा दर 83 हजार 130 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर 90690 रुपये प्रति दहा हजार एवढा आहे. Gold Price Today

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या whatsapp ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “लग्नसराईत सोने खरेदी करणाऱ्यांची चिंता वाढली! सोन्याच्या किमतीत पुन्हा वाढ; जाणून घ्या नवीन दर”

Leave a Comment