Hero Vida VX2 Price | आजकाल पेट्रोलचे दर गगनाला भिडलेत. शहरी असो वा ग्रामीण, सर्वसामान्य माणसाला दररोजचा प्रवास करताना खर्चाचा ताण जाणवतोय. पण याच काळात Hero MotoCorp ने ग्राहकांच्या गरजा ओळखत एक भन्नाट इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात उतरवली आहे Vida VX2. ही स्कूटर विशेषतः त्याच्या किंमतीमुळे आणि जबरदस्त फीचर्समुळे चर्चेचा विषय ठरतेय.Hero Vida VX2 Price
हे पण वाचा| तुमच्या गावातील MahaDBT अनुदान मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी मोबाईलवर फक्त २ मिनिटात तपासा!
होय, फक्त 59,490 रुपयांत (एक्स-शोरूम) ही स्कूटर आपल्या घरी नेता येणार आहे. एवढं कमी किमतीत Hero सारख्या मोठ्या ब्रँडची इलेक्ट्रिक स्कूटर मिळणं ही सामान्य माणसासाठी मोठी गोष्ट आहे. शाळेत जाणारी मुलं असोत, कामावर जाणारे कर्मचारी असोत किंवा गावात राबणारे तरुण सगळ्यांसाठी उपयुक्त स्कूटर आहे ही.
दोन व्हेरियंट्स, दोन उपयोग…
ही स्कूटर दोन व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे Go आणि Plus. दोन्ही व्हेरियंटसचे खास फीचर्स आहेत.
Go व्हेरियंटमध्ये 2.2 kWh बॅटरी आहे, जी एका चार्जमध्ये 92 किमीची रेंज देते.
तर Plus व्हेरियंटमध्ये 3.4 kWh बॅटरी असून ती एका चार्जवर तब्बल 142 किमीची रेंज देते.
कायम कामावर जाणाऱ्या व्यक्तींसाठी किंवा गावात एखादी कामाची जागा लांब असलेल्यांसाठी ही स्कूटर फायदेशीर ठरते. शिवाय, यात AC फास्ट चार्जिंगचा पर्याय दिला आहे. फक्त 60 मिनिटांत बॅटरी 0 ते 80% चार्ज होते. Go व्हेरियंटला पूर्ण चार्ज होण्यासाठी 3 तास 53 मिनिटे लागतात.
हे पण वाचा| महाराष्ट्रात पावसाचा जोरदार कमबॅक! पुढील 5 दिवस कोणत्या जिल्ह्यात बरसणार जोरदार पाऊस?
रस्त्यावर धावतेही तगडी!
गो व्हेरियंटचा टॉप स्पीड आहे 70 किमी/तास, तर प्लस व्हेरियंटचा टॉप स्पीड आहे 80 किमी/तास. म्हणजेच ग्रामीण भागातल्या गढूळ रस्त्यांपासून ते शहरातील गजबजाटातही ही स्कूटर सहज धावू शकते. Eco आणि Ride मोड यामध्ये सहज स्विच करता येतो.
बॅटरी काढा आणि घरी चार्ज करा!
या स्कूटरमध्ये दोन काढता येणाऱ्या बॅटऱ्या आहेत. या घरी नेऊनही चार्ज करता येतात. ग्रामीण भागात जिथं चार्जिंग स्टेशन नाही, तिथं ही सुविधा उपयोगी ठरते.
काय काय मिळतं स्कूटरमध्ये?
Vida VX2 मध्ये दिली आहेत काही खास वैशिष्ट्यं:
फुल एलईडी लाईट्स
- GPS ट्रॅकिंग आणि रिमोट इमोबिलायझेशन
- 4.3 इंच रंगीत TFT स्क्रीन
- 33.2 लीटर सीटखालील स्टोरेज
- 12-इंच डायमंड कट अलॉय व्हील्स
- फ्रंट डिस्क ब्रेक
- पिलियन बॅकरेस्ट
- या फीचर्समुळे ही स्कूटर केवळ प्रवासासाठी नव्हे, तर सुरक्षिततेच्या दृष्टीनेही एक आदर्श पर्याय आहे.
सामान्य माणसासाठी एक संधी
आज एकीकडे महागाई वाढतेय, शेतकऱ्यांना आणि मजुरांना प्रवासासाठी पर्याय कमी पडत आहेत. दुसरीकडे, सरकारी इंधन दरांवर अवलंबून न राहता आपण आपल्या हातात पर्याय घ्यायची वेळ आली आहे. Hero ने जे पाऊल टाकलंय, ते पर्यावरणदृष्ट्या आणि अर्थदृष्ट्याही सकारात्मक आहे.
डिस्क्लेमर:
वरील माहिती ही विविध माध्यमांतून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सादर करण्यात आली आहे. स्कूटरची किंमत, फीचर्स, बॅटरी रेंज आणि इतर तांत्रिक तपशील हे वेळोवेळी कंपनीकडून बदलले जाऊ शकतात. कृपया Vida VX2 खरेदीपूर्वी Hero MotoCorp च्या अधिकृत वेबसाइटवर किंवा नजीकच्या अधिकृत डीलरशी संपर्क साधून तपशीलांची खात्री करावी. लेखातील उद्देश वाचकांना प्राथमिक माहिती पुरविणे आहे, कोणतीही थेट खरेदीची शिफारस करण्याचा हेतू नाही.
1 thought on “फक्त 59,490 रुपयांत Hero ची स्वस्तातली बेस्ट इलेक्ट्रिक स्कूटर! 142 किमी रेंज आणि जबरदस्त फीचर्स!”