उन्हाळी कांद्याला बाजारात किती मिळतोय दर? जाणून घ्या कांदा बाजार भाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kanda Bajar Bhav: राज्यात आज कांद्याची एकूण दोन लाख 34 हजार 442 क्विंटल आवक झाली आहे. यामध्ये 72128 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली आहे. यानंतर 21 हजार 622 क्विंटल लोकल कांद्याची आवक झाली आहे. यानंतर तीन क्विंटल एक नंबर कांद्याची आवक झाली आहे. 2003 क्विंटल पांढरा कांद्याची आवक झाली आहे. दहा हजार 285 क्विंटल पोळ कांद्याची आवक झाली आहे. यानंतर सर्वात जास्त एक लाख आठ हजार 816 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक बाजारामध्ये झाली आहे. उन्हाळी कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.

हे पण वाचा | लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार? ‘या’ दिवशी खटाखट पैसे जमा होऊ शकतात..

उन्हाळी कांद्याचे बाजारात आवक वाढल्यामुळे बाजारात कांद्याला किती दर मिळतो याबद्दल आपण सविस्तर माहिती या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. सर्वाधिक आवक अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये उन्हाळी कांद्याची झालेली आहे. या ठिकाणी कमीत कमी 300 ते सरासरी 1250 रुपये प्रतिक्विंटल दर उन्हाळी कांद्याला मिळाला आहे. तसेच आज कळवण येथ 1400 रुपये प्रति क्विंटल तर संगमनेर येथे 1050 रुपये प्रति क्विंटल, सटाणा येथे 1450 रुपये प्रति क्विंटल, पिंपळगाव बसवंत येथे 1450 रुपये प्रति क्विंटल, देवळा येथे 1375 रुपये प्रति क्विंटल, येवला येथे 1350 रुपये प्रति क्विंटल सरासरी दर मिळाला आहे.

उन्हाळी कांदा बाजारात आला असला तरी लोकल कांद्याचे आवक देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. पुणे येथे लोकल कांद्याला सरासरी 1200 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. त्याचबरोबर पोळ कांद्याला नाशिक पिंपळगाव बसवंत येथे 1350 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. त्याचबरोबर नागपूर मध्ये पांढऱ्या कांद्याला 1450 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. हिंगणा बाजार समितीमध्ये 2066 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. Kanda Bajar Bhav

हे पण वाचा | लग्नसराईत सोने खरेदी करणाऱ्यांची चिंता वाढली! सोन्याच्या किमतीत पुन्हा वाढ; जाणून घ्या नवीन दर

आज मागील आठवड्याच्या तुलनेत उन्हाळी कांद्याची आवक वाढल्याचे दिसत आहे. मात्र बाजारात अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वर्तवली जात आहे. दरम्यान बाजार समितीच्या काही व्यापाऱ्याची चर्चा झाल्यानंतर ही बाब समोर आली की, अगाप कांदा असल्याने पुरेशी वाढ झालेली नाही पूर्णपणे कांदा बाजारात अजून दाखल झाला नसल्यामुळे दर दबावाखाली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. कांद्याची आवक बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढले असली तरी कांद्याचे दर दबावाखाली असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होत आहे.

हे पण वाचा | राज्यातील या भागात अवकाळी पावसाची शक्यता; जाणून घ्या राज्यातील हवामान अंदाज

बाजार समितीआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
कोल्हापूर911470020001400
जालना14650020001200
अकोला61480016001200
चंद्रपूर – गंजवड344120020001700
मुंबई – कांदा बटाटा मार्केट884390018001350
खेड-चाकण150130018001500
सातारा41450018001150
सोलापूर3357220022501300
येवला400030013811250
धुळे130535016001450
लासलगाव – निफाड106080015001350
मालेगाव-मुंगसे1000030015651225
नागपूर3000100018001600
सिन्नर – नायगाव109550015001400
मनमाड250050014341300
सटाणा223043014301300
देवळा83560014001300
उमराणे1250050014901100
सांगली -फळे भाजीपाला397350019001200
पुणे1305570017001200
पुणे- खडकी23100018001400
पुणे-मोशी124680014001100
चाळीसगाव-नागदरोड1900120014001300
मलकापूर128095013701070
कर्जत (अहमहदनगर)2670016001200
मंगळवेढा9730017001400
नागपूर2000100016001450
नाशिक424560017211350
पिंपळगाव बसवंत600075015601350
अहिल्यानगर3091830017001250
येवला600040014601300
येवला -आंदरसूल300040815111340
लासलगाव – निफाड4416100016111500
राहूरी -वांबोरी108120017001300
कळवण1230055518001401
संगमनेर1233530018001050
मनमाड20062414511350
सटाणा1104040016301450
कोपरगाव4976100016691400
पिंपळगाव बसवंत1200070017991451
पिंपळगाव(ब) – सायखेडा1400100015001400
गंगापूर185070015251250
देवळा730065015801375

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment