varas nond maharashtra :- राज्य सरकारने वारस नोंद संबंधित एक मोठा निर्णय घेतला आहे. शेत जमिनीचे व्यवहार कर्ज प्रकरणे व कायदेशीर प्रक्रियांमध्ये सातबारावर मृत्यू खातेदारांची नोंद असल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचण निर्माण होत असल्याने सरकारने आता या संबंधित एक मोठा निर्णय घेतला आहे. या सर्व समस्येचे निवारण करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यभरात जीवन सातबारा मोहीम राबवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.varas nond maharashtra
हे पण वाचा :- मोठी बातमी ! वारस नोंद संदर्भात महसूलमंत्र्यांनी घेतला नवीन मोठा निर्णय शेतकऱ्यांना होणार फायदा
1 मार्चपासून बुलढाणा जिल्ह्यात सुरू असलेली ही मोहिम आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत गावातील मूर्त खातेदारांच्या वारसाचे अतिरिक्त नोंद केली जाईल व वारसाचे नाव सातबारावर नसल्याने त्या वर्षाला होणारे अडचणी दूर होणार आहे. आता मृत व्यक्तींचे नाव वरील जमीन या मोहिमेदोरे यांच्या वारसाच्या नावावर येणार असल्याची माहिती देखील दिली आहे.
काय असणार वारस नोंद प्रक्रिया :-
सर्वप्रथम एक एप्रिल ते पाच एप्रिल दरम्यान ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी गावोगावी चावडी वाचन करतील आणि न्यायालयीन प्रकरण प्रकरण वगळून मयत खातेदारांची सर्व माहिती गोळा केल्यानंतर यादी तयार करणार आहे. यानंतर सहा ते वीस एप्रिल दरम्यान वारसांनी आवश्यक कागदपत्रे ज्यामध्ये मृत्यू प्रमाणपत्र वारस प्रमाणपत्र ग्रामसेवक किंवा सरपंच यांचा रहिवासी दाखला आणि संपर्क माहिती तलाठी कार्यालयात जमा करावी.
हे पण वाचा :- मोठी बातमी! पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता या तारखेला होणार जमा? हे शेतकरी होणारा अपात्र
यानंतर 31 एप्रिल ते १० मे तलाठी फेरफार प्रणाली द्वारे वारसाची नोंद अद्यावत येणार आहे. व सातबारा वरील सुधारणा महाराष्ट्रातील जमीन महसूल अधिनियमन 1966 नुसार मंडळ अधिकारी सुधारित सातबारा तयार करणार आहे ही संपूर्ण प्रक्रिया विनाशुल्क असणार आहे.
यामध्ये तहसीलदार तालुका सन्माननीय अधिकारी म्हणून काम पाहतील व जिल्हाधिकारी मोहिमेचे निरीक्षण करणार आहे. त्याचबरोबर विभागीय आयुक्त सनियंत्रक अधिकारी म्हणून आपले कार्यरत राहणार आहेत प्रत्येक सोमवारी मोहिमेतील प्रगती अहवाल ईमेलद्वारे सादर करावा लागणार आहे. या मोहिमेद्वारे वारसांना त्यांच्या जमिनीचा हक्क मिळून देण्यासाठी एक खास मोहीम ठरणार आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा