Ladki Bahin Yojana 11th installment :- महाराष्ट्रातल्या लाखो महिलांना दर महिन्याला आधार देणारी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ आता मे महिन्याच्या हप्त्यामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला थेट बँक खात्यात १५०० रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं जातं, जे त्यांच्या रोजच्या खर्चाला थोडा हातभार लावतं. आजपर्यंत १० हप्ते जमा झाले असून आता सर्वांचं लक्ष अकराव्या हप्त्याकडे लागलं आहे.Ladki Bahin Yojana 11th installment
हे पण वाचा | लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! या दिवशी मिळणार १५०० रुपये, तुमच्या खात्यात कधी येणार?
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतंच सांगितलं की, या योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्यासाठी ३.३७ कोटी रुपयांच्या फायलीवर त्यांनी स्वाक्षरी केली असून, लवकरच पात्र महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल. प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होताच पैसे पाठवले जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेही लवकरच याबाबत अधिकृत माहिती देणार असल्याचं त्यांनी सूचित केलं आहे.
या दिवशी मिळणार महिलांना हप्ता ?
या योजनेअंतर्गत मिळणारे पैसे नेहमीप्रमाणे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे २५ तारखेनंतर खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या शेवटी फक्त चारच दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे येत्या काही दिवसांत महिलांना हा हप्ता मिळेल असा अंदाज आहे. त्यामुळे ज्यांच्या घरात सध्या पैशाची टंचाई आहे, अशा महिलांसाठी हा हप्ता म्हणजे मोठा दिलासा ठरणार आहे.
हे पण वाचा | लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! या दिवशी मिळणार १५०० रुपये, तुमच्या खात्यात कधी येणार?
मात्र, काही महिलांना या महिन्याचा हप्ता मिळणार नाही. कारण सरकारनं अर्जांची पुन्हा पडताळणी सुरू केली आहे. काहींनी बनावट कागदपत्रं सादर करून अनुदान मिळवल्याचं आढळलं आहे, तर काही पुरुषांनी महिला नावाने खाती उघडून फसवणूक केल्याचंही निदर्शनास आलं आहे. अशा अपात्र लाभार्थ्यांचे अर्ज रद्द करण्यात येणार असून, त्यांना पुढील हप्तेही मिळणार नाहीत.
लाडक्या बहिणींना मिळणार आर्थिक मदत !
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. ‘लाडकी बहीण योजना’ लाभार्थी महिलांना लघुउद्योग किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी बँकांच्या माध्यमातून ४० हजार रुपयांपर्यंतचं कर्ज मिळवून देण्याचा शासनाचा विचार आहे. आणि विशेष म्हणजे या कर्जाचे हप्ते शासन स्वतः भरणार आहे. त्यामुळे ज्यांच्या मनात उद्योग करण्याचं स्वप्न आहे, पण आर्थिक आधार नाही, अशा महिलांसाठी ही योजना भविष्यात नवा मार्ग उघडू शकते.
म्हणजे एकीकडे महिन्याचा हप्ता मिळतच राहील आणि दुसरीकडे काहीतरी सुरूवात करण्यासाठी सरकार मदतीला उभं राहील. ही योजना केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित न राहता, महिलांना स्वावलंबी बनवण्याचं सरकारचं पाऊल वाटतं.
अशा अनेक नवनवीन माहितीसाठी येथे क्लिक करून तुम्ही आमच्या whatsapp ग्रुप जॉईन करा