Mazi Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना महाराष्ट्र सरकारच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपयांचे आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते. शेतात राबणारी आई असो, मुलांचं संगोपन करणारी गृहिणी असो, की कामासाठी रोज बाहेर पडणारी स्त्री प्रत्येकाच्या आयुष्यात सावरण्याचा ध्यास असतो. त्यासाठी थोडा आधार लागतो आणि सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना हा आधार देण्याचा एक प्रयत्न आहे. आता या योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली असून, लाखो महिलांच्या चेहऱ्यावर हास्य उमटवणार आहे.
हे पण वाचा | रेशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी! आता मोफत रेशनसोबत मिळणार दरमहा 1,000 रुपये; जाणून घ्या पूर्ण माहिती
मे महिन्याचा हप्ता कधी मिळाला?
लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात मे महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता लवकरच जमा होणार आहे. या हप्त्यासाठी आदिवासी विकास खात्याचा तब्बल ३३५ कोटी ७० लाख रुपयांचा निधी वळवण्यात आला आहे. हा निधी महिला व बालविकास विभागाकडे सुपूर्द करण्यात आला असून, त्याच्याच आधारे महिलांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातील. मे महिना संपायला अवघे ६ दिवस उरले आहेत आणि त्यामुळे येत्या २८-३१ मे दरम्यान हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक महिलांना वाट पाहावी लागलेली ही रक्कम आता काही दिवसांतच त्यांच्या खात्यात पोहोचू शकते.
हे पण वाचा | राज्यातील या 6 जिल्ह्यांना हवामान खात्याचा अलर्ट; या भागात होणार अतिमुसळधार पाऊस
मे-जून हप्ता एकत्र जमा होण्याची शक्यता देखील
जर काही कारणास्तव मे महिन्याचा हप्ता वेळेत जमा झाला नाही, तर सरकार मे आणि जूनचा हप्ता एकत्र म्हणजेच थेट ३००० रुपये जमा करण्याचा विचार करत असल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे महिलांनी काळजी करण्याची गरज नाही. सरकारकडून वेळोवेळी अपडेट दिले जातील. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून या संदर्भात अधिकृत माहिती अपेक्षित आहे. त्या स्वतः ट्वीट करुन हप्त्याच्या तारखेची माहिती देतात, त्यामुळे त्यांच्या घोषणेची वाट पाहणे गरजेचे आहे. Mazi Ladki Bahin Yojana
हे पण वाचा | सोनं झालं स्वस्त..! आज सोनं खरेदी करायची सुवर्णसंधी; जाणून घ्या 22, 24 आणि 18 कॅरेटचे नवीन दर
काय करावे महिलांनी?
- आपले बँक खाते अपडेट ठेवा
- मोबाईलवर SMS सेवा सुरू ठेवा, जेणेकरून जमा झालेल्या रकमेची लगेच माहिती मिळेल
- गावात/महिला मंडळात यासंदर्भात येणाऱ्या अधिकृत सूचना लक्षात ठेवा
- अफवांवर विश्वास ठेवू नका, फक्त अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा
हे पण वाचा | वाईट काळ संपला! 26 मे 2025 पासून ‘या’ 3 राशींचा सुरू होणार नव्या यशाचा प्रवास; मिळणार जबरदस्त यश..
ही योजना म्हणजे केवळ १५०० रुपयांचा हप्ता नाही, तर महिलांच्या हातात सक्षमता देणारी उर्जा आहे. एक छोटीशी मदत जरी असली, तरी ती त्यांच्या रोजच्या जगण्यात मोठा फरक घडवते. ज्या समाजात महिलांना आधार मिळतो, तो समाज निश्चितच पुढे जातो. लाडकी बहिणींसाठी हा आर्थिक आधार म्हणजे त्यांच्या संघर्षातले एक उबदार पाऊल आहे. हप्त्याची वाट पाहणाऱ्या सर्व महिलांना मनापासून शुभेच्छा तुमच्या खात्यात लवकरच आनंदाचा मेसेज यावा हीच इच्छा आहे. मात्र याबाबत अजून कोणती यादी प्रदूषणा झालेली नाही त्यामुळे महिलांनी कोणत्याही फसव्या बातमी पासून सावध राहावे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा
2 thoughts on “लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! या दिवशी मिळणार १५०० रुपये, तुमच्या खात्यात कधी येणार?”