महाराष्ट्रात मान्सूननं केली धडाक्यात एण्ट्री राज्यभरात पावसाचा जोर, काही ठिकाणी रेड अलर्ट


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain Alert :- महाराष्ट्रात यंदा मान्सूननं नेहमीपेक्षा तब्बल १२ दिवस आधी हजेरी लावली आणि आता तर गेल्या तीन दिवसांपासून राज्यभर पावसानं थैमान घातलं आहे. आज मंगळवार, २७ मे २०२५ रोजी देखील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.Maharashtra Rain Alert

हे पण वाचा | अवकाळी पावसाचा कांद्याला फटका! लवकरच भाववाढीची शक्यता; जाणून घ्या सविस्तर…

मुंबई-पुण्यात पावसाचं जोरदार आगमन


मुंबई शहरात आज पहाटेपासूनच रिमझिम पावसाने सुरुवात झाली. हिंदमाता, दादर, अंधेरी, वांद्रे या भागांमध्ये रात्रीपासूनच सतत पावसाचा शिडकावा सुरू आहे. सोमवारी झालेल्या पावसामुळे मुंबईतील मेट्रो स्थानकांत पाणी साचलं, काही ठिकाणी रेल्वेसेवेवर परिणाम झाला. हवामान खात्यानं आजही मुंबईसाठी ‘येलो अलर्ट’ दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, अशी विनंती प्रशासनाकडून करण्यात येतेय.

हे पण वाचा | शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! या तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार अनुदान वाचा सविस्तर माहिती

कोकणात मुसळधार; रत्नागिरी-सिंधुदुर्गात रेड अलर्ट


कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागांमध्ये ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला असून, स्थानिक प्रशासन सज्ज आहे. नदी-नाल्यांचं पाणी वाढल्याने काही भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

या जिल्ह्यामध्ये ‘ऑरेंज अलर्ट’


पुणे (घाटमाथा), बीड, परभणी, हिंगोली, नांदेड आणि रायगड जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुण्यातल्या काही भागांत पावसानं कहर केला असून, कर्वेनगर भागात झाड कोसळून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. खेड तालुक्यात वीज कोसळल्यामुळे मासेमारी करणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला. दौंडमध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याची दु:खद घटना समोर आली आहे. पुणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

हे पण वाचा | शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! या तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार अनुदान वाचा सविस्तर माहिती

या जिल्ह्यांमध्ये सतर्क राहण्याचा इशारा


मुंबई, ठाणे, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, गडचिरोली व इतर काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. या भागांमध्ये हवामान विभागाने ‘येलो अलर्ट’ दिला आहे. शाळा-कॉलेजांनी शक्य असल्यास ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करावा, अशाही सूचना दिल्या जात आहेत.

येवल्यात वादळी वाऱ्यांसह पावसाचा तडाखा; शेतकऱ्यांचे नुकसान


नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात पावसानं वादळी वाऱ्यांसह जोरदार हजेरी लावली. दिवसभराच्या असह्य उकाड्यानंतर थोडा दिलासा मिळाला असला, तरी कांद्याचं पीक भिजल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. या भागातील काही शेतकऱ्यांनी आपले कांदे भरलेल्या गोदामात स्थलांतरित करण्याचा प्रयत्न केला, पण वाऱ्याचा जोर एवढा होता की अनेक ठिकाणी पोल्ट्री शेड्स, प्लास्टिक शेड्स उडून गेले.

मान्सूनच्या या पहिल्या टप्प्यातच निसर्गाची ताकद जाणवतेय


राज्यात पावसाने ज्या पद्धतीनं सुरुवात केली आहे, ती निश्चितच धोक्याची घंटा आहे. नद्या, ओढ्यांचा पाणीपातळी झपाट्यानं वाढत असल्याने खेड्यांतील पूल बंद होऊ लागले आहेत. पुराच्या संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश काही ठिकाणी दिले गेले आहेत.

हे पण वाचा | अवकाळी पावसाचा कांद्याला फटका! लवकरच भाववाढीची शक्यता; जाणून घ्या सविस्तर…


या हवामानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पुराच्या सखल भागांपासून दूर राहावं, विजेच्या तारांपासून सावधगिरी बाळगावी आणि प्रशासनाच्या सूचना पाळाव्यात, हे अत्यंत आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी देखील हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन पेरणीचे निर्णय घ्यावेत.पावसाचं आगमन हे जसं दिलासादायक आहे, तसंच यामध्ये धोकेही लपलेले आहेत. आपल्या सुरक्षिततेसाठी योग्य ती काळजी घेणं, हेच सध्या सर्वात महत्त्वाचं आहे. मान्सूनचा हंगाम हे निसर्गाचं देणं आहे, पण त्याचा सामना करण्याची तयारी आपल्याकडे असली पाहिज

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment