Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात आता दोन हप्त्याचे तीन हजार रुपये एकत्रित जमा करण्यात येणार आहेत. राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या प्रबळ बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.
मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या लाडक्या बहिणींना मिळणार 3,000 हजार रुपये ? मोठी अपडेट
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. या योजनेत फेब्रुवारी महिना संपला आहे मात्र अजून फेब्रुवारी महिन्याचा हप्ता महिलांना मिळाला नाही. त्यामुळे महिलांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यातील गोरगरीब महिलांना या योजनेअंतर्गत आर्थिक मदत दिली जाते. दरम्यान आता दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्रित महिलांना मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
लाडकी बहीण योजनेत महिलांना फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये असे मिळून एकत्रित तीन हजार रुपये दिले जाणार आहेत. दरम्यान मार्च महिन्यात महिलांना 2100 रुपये मिळणार असल्याची चर्चा होत आहे. अर्थसंकल्पानंतर महिलांना 2100 रुपये देण्याची घोषणा होणार आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे आता पुढच्या महिन्यात महिलांना एकूण किती पैसे मिळतात याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे. Ladki Bahin Yojana
हे पण वाचा | मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ! जाणून घ्या नवीन दर..
पडताळणी सुरू…
दरम्यान लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी सुरू आहे. सर्व अर्जाची पडताळणी झाल्यानंतरच महिलांना पैसे देणार असल्याची माहिती समोर आली आहे. ही पडताळणी पाच टप्प्यांमध्ये केली जाणार आहे. त्यातील काही अर्जाची पडताळणी झालेली असून यातून आतापर्यंत नऊ लाख महिलांचे अर्ज बाद झाले आहेत. एकूण 50 लाख महिलांचे अर्ज बाद होत असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिलांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला असल्याची माहिती समोर आल्यानंतर या योजनेची पडताळणी करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे.
हे पण वाचा | सरकारची कडक कारवाई! तुमच्याकडे दोन पॅन कार्ड असतील तर भरावा लागणार 10,000 रुपये दंड..
फेब्रुवारी चा हप्ता का मिळाला नाही?
लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता फेब्रुवारी महिना संपला आहे तरी महिलांना मिळालेला नाही. यामागे दोन कारण असू शकतात. पहिलं म्हणजे अर्जाची पडताळणी सुरू आहे ती पूर्ण झाल्याशिवाय महिलांना पैसे मिळणार नाही असे सांगितले जात होते. दुसरं कारण म्हणजे काही तांत्रिक अडचणीमुळे पैसे जमा न झाल्याचे देखील सांगण्यात आले होते. मध्यंतरी एका कार्यक्रमात अजित पवार यांनी सांगितले होते की लाडकी बहीण योजनेच्या निधीच्या चेकवर सही करून आलो आहे. पुढील आठ दिवसात पैसे येतील मात्र, अजून महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे एकत्रित महिलांना मिळणार आहेत.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा