Pan Card New Update: भारत सरकारने पॅन कार्ड २.० लॉन्च केले आहे. या पॅन कार्डद्वारे डुबलीकेट पॅन पूर्णपणे काढून टाकण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. असे असताना देखील जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असतील तर सावध व्हा. कारण आयकर विभागाने डुबलीकेट पॅन कार्ड धारकांना नवीन नियमानुसार कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन नियमानुसार तुम्ही तुमचे अतिरिक्त पॅन कार्ड सरेंडर करणे आवश्यक आहे. जर तुम्ही तुमचे अतिरिक्त पॅन कार्ड सरेंडर केले नाही तर तुम्हाला दहा हजार रुपये दंड भरावा लागू शकतो. अशा परिस्थितीत एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असणे योग्य आहे का अयोग्य असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात कर्जमाफी जाहीर होणार का? शेतकऱ्यांना मोठी अपेक्षा…
प्राप्तिकर कायदा 1961 नुसार, कोणत्याही पॅन कार्डधारकांना एकापेक्षा जास्त पॅन कार्ड ठेवता येत नाही. जर एखाद्याने चुकून किंवा जाणून-बजून डुबलीकेट पॅन कार्ड बनवले असेल तर त्याने ते तात्काळ सरेंडर करणे आवश्यक आहे. तसे न केल्यास सरकार त्या व्यक्तीवर कठोर कारवाई करून तब्बल दहा हजार रुपयांचा दंड आकारू शकते.
सरकारने आत्ताच पेन 2.2 योजनेला सुरुवात केली आहे. पेन आणि त्यांचे व्यवस्थापन सुलभ आणि सुरक्षित व आधुनिक करणे हा या योजनेचा उद्देश आहे. डुबलीकेट पॅन कार्ड काढून टाकणे आणि फसवणूक रोखणे देखील या योजनेचा उद्देश आहे. याशिवाय पेन आणि त्यांची प्रक्रिया पूर्वीपेक्षा अधिक जलद आणि सुलभ करण्याचा सरकारचा हेतू आहे. या योजनेअंतर्गत सरकार नवीन तंत्रज्ञान वापरून ही योजना अधिक चांगल्या रित्या राबवत आहे. एखाद्या व्यक्तीच्या नावावर एकच पॅन कार्ड असेल आणि कोणत्याही प्रकारचे फसवणूक होऊ नये.
१ मार्चपासून आधार कार्ड वर लागू होणार नवीन नियम! आता आधार कार्डची कामे होणार झटपट..
तुमच्याकडे दोन पॅन कार्ड असेल तर काय करावे?
तुमच्याकडे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असल्यास तुम्हाला अतिरिक्त पण ताबडतोब सरेंडर करावे लागणार आहे. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला NSDL किंवा UTIITSL या पोर्टलवर जावे लागेल. यानंतर पॅन सरेंडर करण्यासाठी फॉर्म भरावा लागेल. आता आवश्यक असणारी कागदपत्रे जोडा आणि फॉर्म सबमिट करा. येथे तुम्हाला सरेंडर केलेल्या पॅन कार्ड च पावती मिळेल. Pan Card New Update
जेव्हा तुम्ही तुमच्या दुसरे पॅन कार्ड सरेंडर करता तेव्हा हे लक्षात ठेवले पाहिजे की तुमचे वैद्य पॅन कार्ड आधारशी लिंक असले पाहिजे. बँक खाते टॅक्स रेकॉर्ड आणि गुंतवणुकीची माहिती ही बरोबर असावी. तुमचे मूळ पॅन कार्ड कधीही सरेंडर करू नका, फक्त डुबलीकेट किंवा तुम्हाला लागत नसलेले पॅन कार्ड सिलेंडर करा. जर तुम्ही डुबलीकेट पॅन कार्ड वेळेवर जमा केले तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या किंवा दंडाला सामोरे जाण्याचे गरज लागणार नाही.
१ मार्चपासून लागू होणार नवीन नियम! सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर होणार मोठा परिणाम
डुबलीकेट पॅन कार्ड सरेंडर केले नाही तर काय होईल?
जर कोणाकडे डुबलीकेट पॅन कार्ड असेल आणि त्यांनी ते सिलेंडर केले नाही तर तुम्हाला दहा हजार रुपयापर्यंत दंड भरावा लागू शकतो. कलम 272 ब अंतर्गत अशा व्यक्तीला दहा हजार रुपयाचा दंड आकारला जाण्याची शक्यता आहे. याशिवाय तुम्हाला टॅक्स रिटर्न भरण्यास अडचण येऊ शकते आणि बँकिंग आणि आर्थिक व्यवहारांमध्ये समस्या येऊ शकतात. त्यामुळे तुमच्याकडे जर डुबलीकेट पॅन कार्ड असेल तर त्वरित त्याला सरेंडर करा अन्यथा तुम्हाला तब्बल दहा हजार रुपयाचा दंड भरावा लागू शकतो. जर तुम्ही जाणून-बजून एकापेक्षा जास्त पॅन कार्ड वापरत असाल तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा
1 thought on “सरकारची कडक कारवाई! तुमच्याकडे दोन पॅन कार्ड असतील तर भरावा लागणार 10,000 रुपये दंड..”