मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ! जाणून घ्या नवीन दर..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LPG Gas Cylinder Price: प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती नव्याने जाहीर होत असतात. त्याचप्रमाणे मार्च महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती जाहीर झाल्या असून, गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ झाली असल्याची बातमी समोर आली आहे. होळी आणि ईद पूर्वी सरकारी कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ जाहीर केली आहे. 19 किलो व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये आज वाढ झाली आहे. एक मार्च 2025 पासून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये सहा रुपयाची वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्लीत या सिलेंडरची किंमत 1797 वरून वाढून 1803 रुपये झाली आहे.

हे पण वाचा | सरकारची कडक कारवाई! तुमच्याकडे दोन पॅन कार्ड असतील तर भरावा लागणार 10,000 रुपये दंड..

सरकारी कंपन्यांकडून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी सिलेंडरच्या किमती जाहीर होत असतात. त्यानुसार आज पासून नवीन महिना सुरू होत आहे आणि त्यामुळे या कंपन्यांनी आजपासून नवे दर लागू केले आहेत. मात्र हा महिना सणासुदीचा आहे. या महिन्यात होळी आणि ईद यासारखे मोठे सण आहेत. उद्यापासून रमजानचा महिना सुरू होत आहे. याशिवाय या महिन्यात अनेक लग्न तिथी आहेत. आणि अशाच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा परिणाम होणार आहे.

सणासुदीच्या दिवसात आणि त्याचबरोबर लग्नसराईमध्ये सरकारने व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. व्यावसायिक सिलेंडरची किंमत सहा रुपयांनी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे हॉटेलमधले जेवण किंवा इतर पदार्थ महाग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होतो. LPG Gas Cylinder Price

हे पण वाचा | शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात कर्जमाफी जाहीर होणार का? शेतकऱ्यांना मोठी अपेक्षा…

देशातील प्रमुख शहरांमधील सिलेंडरच्या किमती

नव्या दरानुसार दिल्लीतील 19 किलो एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 1797 वरून 1803 रुपये झाली आहे. त्याचबरोबर कोलकत्ता मध्ये या सिलेंडरची किंमत 1907 वरून 1913 रुपये झाली आहे. मुंबई शहरामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1749.50 रुपयावरून 1755.50 रुपये एवढी झाली आहे. त्याचबरोबर चेन्नई शहरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1959 रुपयावरून 1965 रुपये झाली आहे.

एक मार्च 2025 रोजी फक्त व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये बदल झालेला आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य घरातील महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत झालेली वाट पाहता मार्केटमध्ये महागाई वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment