Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारनं सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं फळ आता हळूहळू दिसू लागलं आहे. प्रत्येक महिन्याला मिळणारा १५०० रुपयांचा हप्ता म्हणजे घरखर्चातली एक मोठी मदत मिळत आहे. मे महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे राज्यभरातल्या कोट्यवधी लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे. आणि आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे काही लाडक्या बहिणींच्या खात्यात तब्बल ३,००० रुपये जमा होणार आहेत.
होय, तुम्ही बरोबर वाचताय. काही महिलांच्या खात्यात या वेळेस एक नाही तर दोन हप्ते म्हणजेच १५०० + १५०० = ३,००० रुपये जमा होणार आहेत. कारण, एप्रिल महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यात आला नव्हता. त्यामुळे सरकारने आता एप्रिल व मे अशा दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र करून पाठवायचं ठरवलं आहे. ज्या महिलांना एप्रिल महिन्याचे पैसे मिळाले नव्हते त्या महिलांना एप्रिल आणि मी अशा दोन महिन्याचे एकूण तीन हजार रुपये एकत्रित दिले जाणार आहेत. Ladki Bahin Yojana
हे पण वाचा | आता लाडक्या बहिणींना मिळणार स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी, सरकारचा मोठा निर्णय!
पैसे कधी येणार खात्यात?
लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण दहा त्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. यानंतर मे महिन्याचा म्हणजे अकरावा हप्ता कधी मिळेल याची प्रतीक्षा महिलांना आहे. माहिती सूत्रांच्या मते, २५ मेपासून या योजनेचे पैसे खात्यात टाकण्यास सुरुवात होणार आहे. आणि ३१ मेपर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील. ज्यांच्या खात्यात एप्रिलचा हप्ता आधीच आला आहे, त्यांना मे महिन्याचे १५०० रुपये मिळतील. पण ज्या बहिणींच्या खात्यात एप्रिलचे पैसे आले नव्हते, त्यांना आता दोन महिन्यांचा एकत्रित तीन हजार रुपये मिळतील.
हे पण वाचा | तुमचं रेशन कार्ड मोबाईल मध्ये; ‘Mera Ration 2.0’ अॅपमुळे मिळणार झटपट सेवा!
२.५२ कोटी महिलांना योजनेचा फायदा
महाराष्ट्रात सुमारे २ कोटी ५२ लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळतो आहे. त्या सगळ्याच बहिणी सध्या मे महिन्याच्या हप्त्याची वाट बघत आहेत. ग्रामीण भागातल्या महिलांसाठी ही रक्कम म्हणजे रोजच्या संसारातली मोठी आर्थिक मदत करणारे ठरत आहे. कुठे मुलांना पुस्तकं घ्यायची आहेत, तर कुठे किराणा विकत घ्यायचा आहे, तर कुठे शेतीसाठी बी बियाणे खरेदी करण्यासाठी या पैशाची मदत होत आहे. अशा सगळ्या गरजांना लाडकी बहीण योजनेच्या पैशाचा थोडासा हातभार लागत आहे.
लडकी बहीण योजनेचे पैसे फक्त आर्थिक मदत नसून, सरकारनं दिलेला एक भावनिक आधार आहे. राज्य सरकारनं “माझी लाडकी बहीण” या नावानेच या योजनेला सुरुवात केली हेच दर्शवतं की सरकार बहिणींना केवळ मतदार म्हणून नाही, तर घराचा आधारस्तंभ समजून मदत करतं आहे. सरकारच्या या योजनेचा लाभ घेऊन लाखो महिलांचे आयुष्य आर्थिक दृष्ट्या प्रबळ बनले आहे. अनेक गोरगरीब महिलांच्या कुटुंबाला या योजनेमुळे घर खर्च भागवण्यास मदत होत आहे.
हे पण वाचा | राज्यातील या जिल्ह्यामध्ये होणार जोरदार अवकाळी पाऊस; पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज
एक शेवटची भावना…
आज जेव्हा महागाई वाढली आहे, संसार सांभाळणं कठीण झालं आहे, तेव्हा लाडकी बहिण योजना ही कित्येक घरांमध्ये निराशेवर दिलासा घेऊन येते आहे. हप्ता वेळेवर मिळावा, यासाठी सरकारने आणखी तत्पर राहावं, अशीच सगळ्या बहिणींची अपेक्षा आहे. कारण पैशासोबतच गरज आहे आपुलकीची, आणि सरकारनं ती दाखवली, हेही काही कमी नाही. लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक लाभांसोबत राज्यातील महिला सरकारच्या ऋणी आहेत.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा
1 thought on “Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार तब्बल 3,000 रुपये, कारण काय? जाणून घ्या”