PM Kisan Yojana: शेतकऱ्यांनो, एप्रिल ते जून महिन्याचा ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेचा २०वा हप्ता लवकरच म्हणजेच जूनमध्ये तुमच्या खात्यात जमा होणार आहे. पण हे लक्षात ठेवा, काही महत्त्वाच्या गोष्टी पूर्ण केल्याशिवाय तुमचं नाव यादीतून वगळलं जाईल आणि पैसे मिळणार नाहीत. गेल्या वेळेस अनेकांना हप्ता मिळालाच नाही, कारण ई-केवायसी पूर्ण नव्हती, बँकेचं खातं आधाराशी लिंक नव्हतं, जमीन अद्ययावत नव्हती… आणि त्याचे परिणाम म्हणजे सरकार पैसे देत असतानाही हातात काहीच आलं नाही. म्हणूनच यंदा सरकारने ३१ मे ही अंतिम तारीख दिली आहे.
हे पण वाचा | आता लाडक्या बहिणींना मिळणार स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी, सरकारचा मोठा निर्णय!
सरकारच्या कृषी विभागाकडून गावागावात मोहिमा राबवल्या जात आहेत. तुमचं ई-केवायसी अजून झालं नसेल तर मोबाइल अॅपवरून चेहरा किंवा अंगठा स्कॅन करा, किंवा गावातल्या महा ई-सेवा केंद्रात, कृषी सहायकांकडे जाऊन मदत घ्या. फार काही अवघड नाही, पण उशीर केला तर नुकसान मात्र तुमचंच होईन. आता काही लोक म्हणतात, “माझं नाव तर यादीत आहे, मग काय करायचंय?” पण लक्षात घ्या, नाव यादीत असलं तरी जर खातं आधाराशी लिंक नसेल, किंवा जमिनीचे कागद अपडेट नसतील, तर हप्ता अडकतो. म्हणूनच खातं चेक करा, आणि गरज लागली तर बँकेत किंवा पोस्टात डीबीटी खातं उघडा. PM Kisan Yojana
हे पण वाचा | आता तुमचं रेशन कार्ड मोबाईल मध्ये; ‘Mera Ration 2.0’ अॅपमुळे मिळणार झटपट सेवा!
एक गोष्ट अजून महत्वाची ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’साठी फक्त ‘पीएम किसान’चे पात्र शेतकरीच निवडले जातात. म्हणजे जर ‘पीएम किसान’ योजनेचा लाभ मिळत नसेल, तर ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता मिळण्याचे स्वप्नही दूरच राहील. यासाठी फार्मर आयडी हे ही अनिवार्य केला आहे. अनेकांनी अजूनही तो घेतलेला नाही, त्यामुळे योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनो, ह्या योजना तुमच्यासाठी आहेत, तुमच्या कष्टाचा सन्मान म्हणून आहेत. पण जर वेळेत कागदपत्रं, ई-केवायसी आणि इतर तपशील पूर्ण केले नाहीत, तर हा सन्मान नाहक गमवावा लागेल. कोणावरही विसंबून राहू नका. आपली कामं आपणच केली पाहिजेत.
हे पण वाचा | राज्यातील या जिल्ह्यामध्ये होणार जोरदार अवकाळी पाऊस; पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज
अखेर सांगतो, सरकारी योजना म्हणजे केवळ कागदपत्रांचं काम नाही, तर तुमच्या जगण्याला थोडासा आधार देण्याचा प्रयत्न आहे. म्हणून ३१ मे च्या आत ई-केवायसी, आधार लिंकिंग, जमीन अद्ययावत, फार्मर आयडी अशा सगळ्या गोष्टी पूर्ण करा आणि या हप्त्याचा फायदा घ्या. गरज लागली तर तुमच्या गावातील कृषी सहायक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी कार्यालयात जरूर संपर्क साधा. हा तुमचा हक्क आहे पण तो मिळवण्यासाठी थोडं पुढे यावं लागेल.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा
2 thoughts on “पीएम किसान’चा पुढचा हप्ता जूनमध्ये; पण वेळेत हे केलं नाही, तर गमवाल 4,000 रुपये!”