Ladki Bahin Yojana: आता लाडक्या बहिणींना मिळणार स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी, सरकारचा मोठा निर्णय!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये आजही बायकांना शेवटचा घास घ्यावा लागतो. स्वतःसाठी काही करायचं म्हटलं की घरच्यांचा विचार, परिस्थितीचा बाऊ, आणि पैशाची चणचण यामुळं अनेक स्वप्नं मनातच विरून जातात. पण सरकारनं सुरू केलेल्या लाडकी बहिण योजनेमुळे आता या सगळ्या बंधनांना तडा जाणार आहे.

हे पण वाचा | आता तुमचं रेशन कार्ड मोबाईल मध्ये; ‘Mera Ration 2.0’ अ‍ॅपमुळे मिळणार झटपट सेवा!

अजितदादांचा मोठा निर्णय

नांदेडच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक आश्वासक घोषणा केली “आता फक्त दरमहा ₹1500 देऊन थांबायचं नाही, तर लाडकी बहिण लाभार्थींना स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा म्हणून सरकार बँकेमार्फत ₹40,000 पर्यंत कर्ज उपलब्ध करून देणार आहे.” म्हणजे अगदी थोडक्यात आता घरातल्या बायका उंबरठ्यापलीकडं पाहतील, स्वतःच्या पायावर उभ्या राहतील आणि आपल्या संसाराच्या गाडीला खऱ्या अर्थानं हातभार लावतील.

या कर्जाचं खास वैशिष्ट्य म्हणजे हप्ते सरकारच देणार आहे. या योजनेखाली मिळणाऱ्या कर्जाचे हप्ते महिलांच्या मिळणाऱ्या ₹1500 च्या रकमेतूनच थेट बँकेत भरले जातील. त्यामुळे महिलांना वेगळं ओझं नको आणि आत्मनिर्भरतेचं स्वप्न पूर्ण होणार आहे. तुम्ही जर एखादी किराणा दुकान सुरू करू इच्छित असाल, शिवणकाम, दुधाचा व्यवसाय, घरगुती फूड प्रॉडक्ट्स, सौंदर्यप्रसाधनांचं दुकान, अगदी वडापावचा गाडाही का असेना – कोणताही व्यवसाय सुरू करायची तयारी असेल, तर हा कर्जाचा मार्ग तुमच्यासाठी खुला आहे. Ladki Bahin Yojana

हे पण वाचा | राज्यातील या जिल्ह्यामध्ये होणार जोरदार अवकाळी पाऊस; पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज

पात्रतेच्या अटी या प्रकारे –

  • वय 21 ते 65 वर्षांदरम्यान असावं.
  • महाराष्ट्रात स्थायिक असणं आवश्यक.
  • कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा जास्त नसावं.
  • घरात कोणतीही चारचाकी गाडी नसावी.
  • कुणीही शासकीय नोकरीत नसावा.
  • आधी कुठल्या सरकारी योजनांचा लाभ घेतला असेल, तर या योजनेपासून अपात्र ठरू शकता.
  • म्हणूनच काळजीपूर्वक अर्ज करा. चुकीची माहिती दिल्यास भविष्यात अडचणी येऊ शकतात.

हे पण वाचा | सोन्याच्या भावात पुन्हा मोठा बदल! आज 19 मे ला 10 ग्रॅम सोनं किती रुपयाला मिळते? पहा तुमच्या शहरातील सोन्याचे दर…

कोठे आणि कसा करायचा अर्ज?

योजनेची संपूर्ण माहिती लवकरच अधिकृत वेबसाईटवर https://ladakibahin.maharashtra.gov.in उपलब्ध होईल. संबंधित बँकेत जाऊन अर्ज करावा लागेल आणि कोणत्या व्यवसायासाठी कर्ज हवं आहे, हे स्पष्ट सांगावं लागेल. घरातल्या महिलेला जर एक संधी दिली, एक धीर दिला तर ती संपूर्ण कुटुंबाला उभं करू शकते. ही योजना म्हणजे त्यासाठीचं एक हत्यार आहे. त्यामुळे ज्यांचं नाव या योजनेत आहे, त्यांनी ही संधी गमावू नये. आणि ज्यांचं नाही, त्यांनी पात्रतेनुसार पुढच्या फेरीसाठी तयारी ठेवावी. शेवटी एवढंच महिला उभ्या राहिल्या तर गाव उभं राहतं. बायका कमवायला लागल्या, तर घरातचं भविष्य उजळतं. आणि त्यासाठी सरकारनं दिलेलं हे पाऊल खरंच आशेचा किरण आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्य व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

2 thoughts on “Ladki Bahin Yojana: आता लाडक्या बहिणींना मिळणार स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी, सरकारचा मोठा निर्णय!”

Leave a Comment