Gold Price Today: १० दिवसांत १० तोळं सोनं तब्बल ४८,३०० रुपयांनी स्वस्त, सोनं खरेदीसाठी मोठी संधी!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price Today: पैसा वाचवायचा असेल आणि सोनं खरेदीचं मनात असेल, तर आजची ही बातमी वाचल्याशिवाय पुढं जाऊ नका. सोन्याच्या किमतींमध्ये गेल्या १० दिवसांत मोठी घसरण झाली आहे. तब्बल ४८,३०० रुपयांची बचत १० तोळ्यावर झाली आहे. ही घसरण ग्रामीण भागात लग्नसराईत सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी संधी घेऊन आली आहे. सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक असणाऱ्या नागरिकांसाठी ही बातमी खूप महत्त्वाची ठरू शकते. आज आपण सोन्याचा क्रॉप कशाप्रकारे घसरला आहे किंवा वाढला याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

८ मे रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा ९९,६०० रुपये होता. १८ मे रोजी तो दर ९५,१३० रुपये झाला. म्हणजेच फक्त १० दिवसांत सोनं ४,४७० रुपयांनी स्वस्त झालंय. आणि जर एखाद्याने १० तोळं घ्यायचं ठरवलं असेल, तर त्याने जवळपास ४८,३०० रुपयांची थेट बचत केली असती. सध्या सोन्याचे दर जरी स्थिर असतील तरी यामध्ये पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता बाजारात अभ्यास करणे वर्तवली आहे. त्यामुळे सोने खरेदी करण्याची हीच सुवर्णसंधी असल्याचे देखील सांगितले जात आहे. भविष्यात सोन्याचे दर एक लाखाच्या पुढेच जाणार असल्याचे देखील बाजार अभ्यासकाने अंदाज वर्तवला आहे.

हे पण वाचा | या लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार तब्बल 3,000 रुपये, कारण काय? जाणून घ्या

सध्या सोन्याचे दर किती आहेत? (20 मे २०२५)

प्रकार१ ग्रॅम १० ग्रॅम १०० ग्रॅम
24 कॅरेट ₹9,551₹95,510₹9,55,100
22 कॅरेट ₹8,755₹87,550₹8,75,500
18 कॅरेट ₹7,163₹71,630₹7,16,300
चांदी ₹96.90₹96,900 (प्रति किलो)

हे पण वाचा | पीएम किसान’चा पुढचा हप्ता जूनमध्ये; पण वेळेत हे केलं नाही, तर गमवाल 4,000 रुपये!

सोन्याच्या घसरणीमागचं कारण काय आहे?

  • आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी कमी झाली आहे.
  • डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य स्थिर राहिलं आहे.
  • गुंतवणूकदार सध्या इतर पर्यायांकडे वळत आहेत.
  • या सगळ्याचा थेट परिणाम म्हणजे सोनं स्वस्त झालं आहे.

ग्रामीण भागात लग्नसराई सुरू, हीच खरी वेळ!

आपल्या गावात किंवा शहरात लग्नाचं मोसम सुरु झाला आहे. प्रत्येक घरात सोन्याची खरेदी ही गरजेची असते. काही लोक पाव तोळं, काही अर्धा, तर काही जण ५ ते १० तोळ्यांचं सोनं घेतात. अशा वेळी जर किंमती घसरलेल्या असतील, तर याहून चांगली संधी नाही. आज खरेदी केल्यास तुमच्या खिशातून लाखाच्या घरात कमी पैसे जातील. आणि त्या पैशात एखादा बारीक नेकलेस, चेन किंवा अंगठी जास्त घेता येईल. Gold Price Today

हे पण वाचा | आता लाडक्या बहिणींना मिळणार स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी, सरकारचा मोठा निर्णय!

भाव पुन्हा वाढू शकतात का?

सोने खरेदीदारांसाठी आणखी महत्त्वाचे म्हणजे सोन्याचे भाव पुन्हा एकदा वाढू शकतात. कुठलाही ट्रेंड कायम राहत नाही. अमेरिका, चीन, युक्रेन आदी देशांमधील घडामोडी, चलनवाढ, इंधन दर अशा गोष्टींमुळे दर पुन्हा वाढू शकतात. त्यामुळे ‘उद्या बघू’ म्हणता म्हणता सोन्याचा दर पुन्हा १००,००० पार होऊ शकतो.

शेवटचं एक मनापासूनचं वाक्य…

सोनं फक्त दागिना नाही. ते आपल्या मेहनतीच्या, भविष्याच्या आणि मुलाबाळांच्या सुरक्षिततेचं चिन्ह असतं. शेतात पीक चांगलं आलं की आपण सोनं घेतो, जेणेकरून गरज पडली तर मदतीला येईल. त्यामुळे दर घसरले असतानाच सोनं घ्या, कारण अशा संधी दररोज येत नाहीत. आजचा हा घसलेला दर तुमच्या उद्याचं भविष्य उजळवू शकतो. सोनं स्वस्त आहे, पण संधी महाग आहे ती वाया घालवू नका.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन करा

1 thought on “Gold Price Today: १० दिवसांत १० तोळं सोनं तब्बल ४८,३०० रुपयांनी स्वस्त, सोनं खरेदीसाठी मोठी संधी!”

Leave a Comment