Ladki Bahin Yojana: राज्यातील लाखो महिलांसाठी चालवण्यात येणारी ‘लाडकी बहीण’ योजना म्हणजे अनेक घरांतील कुटुंबासाठी आधाराचा एक हात. प्रत्येक महिन्याला 1500 रुपये मिळणं म्हणजे किराणा, औषधं, शाळेची फी किंवा घरखर्च यासाठी थोडासा हातभारच. पण मे महिना संपत आला तरी अजूनही अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ता जमा झालेला नाही, हे पाहून त्यांच्या मनात चिंता घर करत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर, महिलांच्या WhatsApp ग्रुप्समध्ये, गावातील चौकात, अंगणात, कुठे कुठे एकच चर्चा – “अगं, हप्ता आला का गं?” “माझ्या खात्यात तर काहीच नाहीये अजून!”
हे पण वाचा | मे महिन्यात या लाडक्या बहिणींना मिळणार 3,000 रुपये; जाणून घ्या सविस्तर..
आता आशेचा किरण दिसतोय!
मिळालेल्या माहितीवरून समजतंय की सरकारने ‘लाडकी बहीण’ योजनेचा मे महिन्याचा हप्ता लवकरच जमा करण्याचा निर्णय घेतलाय. यासाठी तब्बल 335 कोटी 70 लाख रुपये इतका मोठा निधी आदिवासी विकास विभागाकडून वळवून महिला व बालविकास विभागाकडे देण्यात आलेला आहे. सध्या मे महिन्याचा शेवट जवळ आल्याने, पुढील 5 दिवसांत म्हणजेच मेच्या अखेरीसच लाभार्थी महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जरी सरकारकडून याबाबत अजून अधिकृत घोषणा झाली नसली, तरी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या कडून लवकरच खात्रीशीर माहिती मिळेल, अशी शक्यता आहे.
हे पण वाचा | लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! या दिवशी मिळणार १५०० रुपये, तुमच्या खात्यात कधी येणार?
जर हप्ता उशिरा आला तर…?
सर्वसामान्य महिलांच्या मनात अजूनही एक शंका आहे – “जर मे महिन्याचा हप्ता वेळेत मिळाला नाही, तर काय?” तर यावरही सरकारनं उपाय ठेवलेला आहे. जर मे महिन्यात रक्कम जमा झाली नाही, तर मे आणि जून दोन्ही महिन्यांचे मिळून 3000 रुपये एकत्रित मिळण्याची शक्यता आहे. महिलांचा सरकारवर विश्वास, पण अपेक्षा वेळेवर मदतीची देखील महिलांना आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या अनेक महिलांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. मात्र, त्याच वेळी त्यांनी हीही अपेक्षा व्यक्त केली आहे की, मदतीची ही रक्कम वेळेत मिळाली तरच तिचा खरा उपयोग होईल. कारण वेळेत न मिळाल्यास पुन्हा कर्ज, उधारी, तगादा यामध्ये महिलांचं आयुष्य अडकतं.
हे पण वाचा | घरबसल्या डाऊनलोड करा आधार कार्ड! अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने; जाणून घ्या सविस्तर..
एक मायेचा हात, पण वेळेवर हवा…
शासनाने ‘लाडकी बहीण’ म्हणून ओळख दिली, तीच ओळख आता महिलांना जगायला आधार देतेय. पण सरकारने दिलेला हा मायेचा हात वेळेवर पोहोचावा, हीच सध्या लाखो बहिणींची मागणी आहे. योजनेचे पैसे कधी जमा होणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून आहे. जसेच अधिकृत घोषणा होते, तसे तुम्हाला लगेच माहिती मिळेल. तोपर्यंत थोडं थांबा, आणि आशा ठेवा की यावेळी हप्ता वेळेवर मिळून हसू तुमच्या चेहऱ्यावर येईल. Ladki Bahin Yojana
टीप: या योजनेविषयी अधिकृत तारीख आणि माहिती मिळताच ती लगेच कळवली जाईल. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका आणि खात्रीशीर स्त्रोतांचीच वाट पाहा.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा
1 thought on “Ladki Bahin Yojana: अखेर प्रतीक्षा संपणार? मे महिन्याचा हप्ता ‘या’ तारखेला जमा होण्याची शक्यता..”