लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज ! ‘या’ तारखेला खात्यात जमा होणार 11वा हफ्ता


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana: शेवटच्या आठवड्याची सुरुवात झाली की आपलं लक्ष बँकेकडे लागतं. हप्ता आला की नाही, मोबाईलवर मेसेज आला का, बँकेत रांगा वाढल्या का हे सगळं दर महिन्याला बघायला मिळतं. कारण ही रक्कम मोठी नसली तरी तिचं महत्व फार मोठं असतं. आणि म्हणूनच ‘लाडकी बहीण’ योजनेतून येणारा हप्ता प्रत्येक महिन्यात महिलांसाठी आधार बनतोय.Ladki Bahin Yojana

योजनेतून एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता २ ते ३ मे दरम्यान जमा झाला होता. आता बहिणींना मे महिन्याच्या हप्त्याची वाट लागली आहे. आणि आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अजितदादा पवार यांनी या योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याच्या फायलीवर सही केली असून हा ११ वा हप्ता लवकरच खात्यावर जमा होणार आहे.

सरकारी पातळीवर काम वेगात सुरू झालंय आणि बँकांनाही सूचना दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यातच, म्हणजे पुढच्या आठ दिवसांत हप्ता खात्यावर जमा होण्याची शक्यता प्रबळ आहे.

पण एक गोष्ट लक्षात घ्या जर काही तांत्रिक कारणांमुळे हप्ता मेमध्ये जमा झाला नाही, तर मे आणि जून दोन्ही हप्ते एकत्रितपणे पुढच्या महिन्यात म्हणजे जूनमध्ये जमा केले जातील. त्यामुळे चिंता करू नका. सरकारने निधीच्या उपलब्धतेवर शिक्कामोर्तब केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून अनेक महिला विचारत होत्या “बाई, मेचा हप्ता कधी येणार गं?” कोणी साखर आणायची म्हणून वाट पाहतंय, कोणाचं मुलाचं फी भरायचं आहे, तर कोणाच्या घरात आजारी सासूबाईंची औषधं बाकी आहेत… हे सगळं लक्षात घेता सरकारकडून मिळणारे हे थोडेसे १,००० रुपयेही कधी कधी फार मोठा आधार वाटतो.

आता सर्वांच्या नजरा बँकांच्या एसएमएसकडे लागल्या आहेत. मोबाईलवर मेसेज न आल्यास जवळच्या बँकेत जाऊन खातं तपासा. कधी कधी पैसे जमा होतात पण मेसेज येत नाही.

लाडक्या बहिणींनो, थोडा धीर ठेवा. सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत आणि तुमच्या खात्यावर लवकरच हप्ता जमा होईल. तोवर गरज असेल तर बँकेत एक चक्कर मारा, तुमचा हक्काचा पैसा तिथंच वाट बघतोय

(Disclaimer: वरील माहिती माहितीस्त्रोच्या आधारे आहे. या बदल आम्ही कुठला ही दावा करत नाही)

हे पण वाचा | Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! 11 व्या हप्त्याचे 1,500 रुपये या तारखेला खात्यात जमा होणार?

1 thought on “लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज ! ‘या’ तारखेला खात्यात जमा होणार 11वा हफ्ता”

Leave a Comment