Maharashtra Weather Update : राज्याच्या वातावरणाबाबत एक मोठी अपडेट समोर आलेले आहे. सध्या राज्यात खरंच मोठी चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे अशातच हवामान खात्याचा अंदाज शेतकऱ्यांसाठी मोठा धक्का देणारा ठरणार आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, पुढील चार आठवड्यात महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. राज्यात मान्सूनचा जोर आधीच ओसरत असताना, आता नव्या अंदाजामुळे पिकांवर पाण्याची संकट उभा राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर नवीन अंदाज काय? शेतकऱ्यांना पुढील उपाययोजना काय करणे गरजेचे आहे या सर्व माहिती खालील प्रमाणे दिलेले आहे. Maharashtra Weather Update
सध्या मराठवाड्या बाबत बोलायचं झाल्यास मराठवाड्यात एक वेगळीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. सध्या मराठवाड्यातील काही पाच जिल्ह्यांना आज पावसाचा इशारा दिला आहे. यामध्ये जालना, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाने विश्रांती घेतलेली आहे. मराठवाड्यात तर अत्यंत बिकट परिस्थिती झालेली आहे काही ठिकाणी अजून देखील पावसाच झालेला नाही. पिकाची वाढ देखील झालेली नाही आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांमधून शासनाकडे अनुदान किंवा पंचनामे करण्याची मागणी होत आहे. मराठवाड्यात अशीच परिस्थिती काही दिवस राहिली तर इथे अत्यंत कठीण परिस्थिती आणि पाणी प्रश्न निर्माण होऊ शकतो. आर्थिक संकटांना देखील व्यापाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना तसेच सामान्य नागरिकांना जावा लागू शकते.
या बदलामागचं कारण समजून घेण्यासारखा आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सूनचा आज सध्या अमृतसर नजीबाद, फतेहगड, हरदोई आणि ईशान्य मध्य प्रदेशातील ठळक कमी दाबाचा केंद्र तिथून दिघा आणि पुढे ईशान्य बंगालचे उपसागरात सक्रिय आहे. मात्र वायु व उत्तर प्रदेशापासून ईशान्य मध्य प्रदेशातील कमी दाबाच्या क्षेत्राशी संबंधित असलेले, समुद्रसपाटीपासून 0.9 किलोमीटर पर्यंत उंचीवरील चक्रकार वाऱ्यांचं जोड क्षेत्र आता पूर्वेच्या तुलनेत बरच कमी ठळक झाल आहे. हेच जोड क्षेत्र कमकुवत होण, हे राज्यातील पाऊस कमी होण्यामागचे एक महत्त्वाचं कारण मानलं जात आहे.
हवामान खात्याच्या नवीन आंदोलनुसार पुढील चार आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. ही नकारात्मक तफवात जर अशीच कायम राहिली, तर सध्या पक्व होण्याच्या अवस्थेत असलेल्या पिकांवर पाण्याचा ताण निर्माण होण्याचा धोका आहे. यात आणखी एक चिंताजनक बाब म्हणजे दुसऱ्या आठवड्यापासून कमाल तापमाना सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे. म्हणजे कमी पावसाने वाढते तापमान या दोन्हीचा एकत्रित परिणाम पिकांवरती होण्याची शक्यता आहे यामुळे शेतकऱ्यांवरती नक्कीच आर्थिक संकट येणार आहे असं म्हणायला काही हरकत नाही.
शेतकऱ्यांनी उपायोजना काय कराव्यात?
या अंदाजाच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना आपल्या पिकांच्या पाण्याचे व्यवस्थापन कडे व्यवस्थित लक्ष ठेवावे. ज्या पिकांना गरज आहे त्या पिकांना पाणी द्या. उपलब्ध पाण्याचा काटकरसर आणि नियोजनबद्ध वापर करा. आणि हवामान खात्याच्या साप्ताहिक अंदाज नियमित तपासून त्यानुसार पुढचं नियोजन करा.
(वरील अंदाज हा भारतीय हवामान विभागाच्या अंदाजावर आधारित आहे.)
हे पण वाचा : 15 जून 2025 पासून पावसाचे रूप बदलणार: पंजाबराव डख यांचा अचूक हवामान अंदाज..
