Farmer ID News : जर तुम्ही देखील शेतकरी असाल, तर ही बातमी नक्की वाचा कारण शासनाने शेतकऱ्यांच्या उपयोगी येणाऱ्या महत्त्वाच्या दस्तऐवजी पैकी एक म्हणजे फार्मर आयडीबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. आता प्रत्येक शेतकऱ्याला सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि इतर सेवा उपभोगण्यासाठी तसेच शेतकरी कर्जमाफी योजनेत लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आलेली आहे. परंतु शेतकऱ्यांना फार्मर आयडीबाबत अनेक संकटांना सामोरे जावे लागत होते. Farmer ID प्रत्यक्षात अस्तित्वात असूनही पोर्टलवर दिसत नव्हत्या, त्यामुळे केवायसीची प्रक्रिया पूर्ण करता येत नव्हती. या समस्येने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी आता एक महत्वाची दिलासादायक एक बातमी समोर आलेली आहे. आणि लवकरच शासन या समस्येचे निराकरण करणार आहे त्यासाठी हा सविस्तर लेख वाचा.
आधीची समस्या आता सुटली
फार्मर आयडीबाबत राज्य शासनाच्या महसुली विभागामार्फत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आयडी प्रत्यक्षात जनरेट झालेले होते, मात्र काही तांत्रिक कारणामुळे ते पोर्टलवर दिसत नव्हते, अशा शेतकऱ्यांची अडचण आता दूर करण्यात आली आहे. अशा शेतकऱ्यांच्या फार्मर आयडी आता पोर्टलवर दिसू लागलेली असून त्यांची KYC प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. Farmer ID
शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय हा मानला जात आहे. ज्या शेतकऱ्यांना फार्मर आयडी संदर्भात प्रॉब्लेम येत असेल, किंवा तुमची फार्मर आयडी दिसत नसेल किंवा जनरेट होत नसेल अशा शेतकऱ्यांनी याबाबत माहिती आपल्या मंडळ अधिकाऱ्याकडे किंवा सहाय्यक निबंध कार्यालयात नोंदवावी. त्यामुळे विभागाला संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचा डेटा एकत्रित करण्यास सोपं जाईल, आणि संबंधित शेतकऱ्यांना या प्रक्रियेच्या माध्यमातून योग्य ती दिशा मिळू शकेल.
फार्मट आयडी असून देखील ती न दिसणे किंवा ती जनरेट न होणे या दोन्ही तांत्रिक कारणामुळे अडचणीत आलेल्या आणि कर्जमाफी पासून वंचित राहण्याची भीती असलेल्या शेतकऱ्यांना हा मोठा एक दिलासा आहे. आता सरकारने याची दखल घेतली असून ठोस पावले उचलल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. यामध्ये सुमारे दोन लाख 31 हजार शेतकऱ्यांना हा दिलासा मिळण्याची शक्यता असल्याची माहिती आहे. पुढील पंधरा दिवसात डेटा संकलनाचं काम पूर्ण झाल्यानंतर, याबाबतचा अंतिम निर्णय जाहीर केला जाईल आणि त्यानंतर या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमुक्तीचा लाभ दिला जाणार आहे.
हे पण वाचा : फक्त 5 मिनिटात तयार करा; फार्मर आयडी कार्ड आणि मिळवा 5 लाख रुपये पर्यंत कर्ज.
