लाडक्या बहिणींना ‘मे’ महिन्याचा हप्ता या दिवशी मिळणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले स्पष्ट..


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mazi Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रात जिथे बहिणींचा सन्मान आहे, तिथे सरकारने त्यांचं जीवन सुसह्य व्हावं यासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना सुरू केली. आपल्या रोजच्या गरजा भागवण्यासाठी धडपडणाऱ्या, संकटातही कणखर उभ्या असणाऱ्या लाखो महिलांना या योजनेचा खूप मोठा आधार मिळालाय. आणि आता, मे महिन्याच्या हप्त्याबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आलीय ती देखील थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कडून आली आहे.

हे पण वाचा | या तारखेपर्यंत महाराष्ट्रात पाऊस धुमाकूळ घालणार, पंजाबराव यांचा शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा..

‘मे’ महिन्याच्या हप्त्याची तयारी

आजपर्यंत राज्यातील अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या विवाहित, विधवा, परित्यक्ता आणि घटस्फोटीत महिलांच्या खात्यात दहा महिने म्हणजेच तब्बल पंधरा हजार रुपये जमा झाले आहेत. जुलै 2024 पासून एप्रिल 2025 पर्यंत सलग दहा महिने सरकारनं हा आधार देत ठेवला. प्रत्येक महिन्याला 1500 रुपये, म्हणजे वर्षाला 18 हजार रुपये मिळत आहेत. एप्रिल महिन्याचा हप्ता 2-3 मे दरम्यान जमा झाल्यानं सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता “मे महिन्याचा हप्ता कधी येणार?”

हे पण वाचा | लाडक्या बहिणींसाठी सरकारची आणखी एक नवीन योजना! आता महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी; पहा सविस्तर..

अजितदादांची मोठी घोषणा –

20 मे 2025 रोजी पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली. त्यांनी स्पष्ट सांगितलं की, “पावणे चार हजार कोटींच्या फाईलवर सही केली आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता लवकरच मिळणार आहे.” सहाय्यक मंत्री आदिती तटकरे यांनी देखील ही माहिती अधोरेखित केली. त्यांचंही म्हणणं आहे की, फाईलवर सही झाली असून प्रक्रिया सुरू झाली आहे. पुढील काही दिवसांत, या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत, मे महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यावर जमा होईल.

हे पण वाचा | मान्सूनचं आगमन लवकरच; 16 वर्षांनी इतिहासाची पुनरावृत्ती, पहा हवामान खात्याचा नवीन अंदाज..

लाखो घरांना दिलासा

लाडकी बहीण योजना ही केवळ आर्थिक मदत नाही, तर ती एक आश्वासक सावली आहे. घरातल्या लेकरांच्या शाळेची फी, आजारी सासूचं औषध, रोजचं बाजाराचं भाडं या साऱ्या गरजा भागवण्यासाठी या हप्त्याचा मोठा उपयोग होतो. विशेषतः ग्रामीण भागातल्या महिलांसाठी हा पैसा म्हणजे दिलासा असतो. Mazi Ladki Bahin Yojana

सरकारला सांगायचं एकच – “मदत वेळेवर मिळाली, तर ती खरंच मदत असते” या योजनेतून लाखो महिलांना आधार मिळतोय, पण वेळेवर मिळालेला पैसा खूप महत्त्वाचा असतो. एखादी आई मुलासाठी शाळेची फी भरण्यासाठी वाट पाहत असते, तेव्हा तिच्या खात्यात पैसे वेळेवर जमा होणं म्हणजे तिच्या चेहऱ्यावरचा आनंद परत येणं असतं. अजितदादांनी दिलेली माहिती जर वेळेत प्रत्यक्षात आली, तर खरंच मे महिना लाडक्या बहिणींसाठी आनंदाचा ठरणार आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment