mofat pithachi girni yojana : राज्य सरकारनं महिलांच्या सक्षमीकरणासाठी घेतलेली दिशा दिवसेंदिवस ठोस होत चालली आहे. ‘माझी लाडकी बहिण’ ही योजना शिंदे सरकारच्या काळात सुरू करण्यात आली आणि अवघ्या काही महिन्यांत राज्यातल्या लाखो महिलांचा आधार ठरली. आजघडीला या योजनेतून राज्यातील पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात आहेत. म्हणजेच एका वर्षात सरळसरळ १८ हजार रुपयांचा थेट आर्थिक फायदा या योजनेच्या माध्यमातून दिला जातोय.mofat pithachi girni yojana
हे पण वाचा | लाडक्या बहिणीसाठी दिलासादायक बातमी ! या तारखेला जमा होणार मे महिन्याचा हप्ता?
ही योजना २०२४ मध्ये सुरू झाली, आणि जुलै २०२५ पासून योजनेचा थेट लाभ मिळायला सुरुवात झाली. आजपर्यंत या योजनेतून १० हप्ते वितरित झाले असून, आता मे महिन्याचा अकरावा हप्ता काही दिवसांत पात्र महिलांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महिलांनी आपल्या खात्याची माहिती आणि पात्रतेची कागदपत्रं वेळेत तपासून घ्यावीत, अन्यथा अनुदान अडकेल.
या योजनेला ग्रामीण भागातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळतो आहे. गावागावात महिलांनी या योजनेंमुळे आर्थिक उभारी घेतली आहे. काही महिलांनी त्या पैशातून किरकोळ व्यवसाय सुरू केला, तर काहींनी मुलांच्या शिक्षणासाठी गुंतवणूक केली.याच यशाच्या पायावर उभं राहत राज्य सरकारनं महिला सक्षमीकरणासाठी आणखी एक पाऊल उचललं आहे – मोफत पिठ गिरणी योजना.
गिरणी योजना म्हणजे नवा आत्मसन्मान ९० टक्के अनुदानात मिळणार स्वतःचा व्यवसाय
महाराष्ट्रातील अनुसूचित जाती आणि जमातीतील महिलांसाठी ही योजना राबवण्यात येत आहे. योजनेच्या अंतर्गत महिलांना ९०% अनुदानावर पिठ गिरणी देण्यात येते. म्हणजे जर गिरणीची किंमत १०,००० रुपये असेल, तर त्यामधून ९,००० रुपये सरकार देणार आणि फक्त उर्वरित १,००० रुपये महिलेला भरावे लागतील.
हे पण वाचा | आता लाडक्या बहिणीच्या लाभार्थ्यांना फक्त ₹500 रुपयेच मिळणार, लाभार्थी यादीत नाव आहे का चेक करा?
ही योजना म्हणजे फक्त आर्थिक मदत नाही, तर स्वाभिमानाचं व स्वावलंबनाचं साधन आहे. गरीब व गरजू महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी हाच एक संधीचा किरण आहे. गावाकडच्या अनेक महिलांनी आधीच अर्ज प्रक्रिया सुरू केली असून काहींनी गिरणीही खरेदी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, “आता कुणाच्या दारात पीठ दळायला जायचं नाही. स्वतःची गिरणी स्वतःचा रोजगार!”
कोण अर्ज करू शकतं? पात्रता काय?
या योजनेसाठी अर्ज करू शकणाऱ्या महिलांचं वय १८ ते ६० वर्षांच्या दरम्यान असावं लागतं. याशिवाय त्यांचं कौटुंबिक उत्पन्न १.२० लाखांपेक्षा कमी असणं गरजेचं आहे. ही योजना सध्या फक्त SC आणि ST वर्गातील महिलांसाठीच खुली आहे.
अर्ज करताना खालील कागदपत्रं अनिवार्य आहेत
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवासी दाखला
- जातीचा दाखला
- उत्पन्न प्रमाणपत्र
- बँक पासबुक
- गिरणी खरेदीसाठीचे कोटेशन
अशाच अनेक नवनवीन माहितीसाठी तुमच्या व्हाट्सअप ग्रुपला येथे क्लिक करून जॉईन करा