Onion Market Price : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सणासुदीच्या काळात एक गोड बातमी मिळालेली आहे ती म्हणजे कांद्याचे भाव पुन्हा एकदा वाढू लागलेले आहेत. खरंचच ही बातमी शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी ठरणार आहे. कारण येत्या काळामध्ये शेतकऱ्यांना दिलासा देणे खूप गरजेचे होते. सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना हा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये एक समाधानकारक परिस्थिती निर्माण झालेली आहे. Onion Market Price
येत्या काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपलेली आहे. त्याआधी शेतकऱ्यांसाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे.ते म्हणजे कांद्याचे दर वाढत आहेत. खरंतर गत वर्षे काही दिवसांपूर्वी कांद्याचे दर तेजीत होते. परंतु यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. मागच्या काही महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकी पार पडली त्यापूर्वी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलेला आहे. शेतकऱ्यांचा कांदा हा बाजार मध्ये कवडीमोल दरामध्ये विकला जात होता. आता परंतु बाजारात सुधारणा झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यातील अनेक बाजार समितीमध्ये कांद्याचे दर पाच हजार रुपये प्रति क्विंटर पर्यंत पोहोचला आहेत. म्हणजे सरासरी बाजार भाव हे देखील 4000 रुपये प्रति क्विंटल च्या आसपास पोहोचलेले आहेत. दरम्यान राज्यात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला कमाल 5500 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळालेला आहे.
महाराष्ट्र राज्याच्या कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार या मार्केटमध्ये आज लाल कांद्याची 31 हजार 684 क्विंटल आवक झालेली आहे आजच्या लिलावात या मार्केटमध्ये लाल कांद्याला किमान पाचशे कमल 5500 आणि सरासरी 2600 रुपये असा दर मिळालेला आहे.
आज सकाळच्या सत्रात कांद्याचे बाजार भाव
आज सकाळच्या सत्रामध्ये नेवासा कृषी उत्पन्न बाजार समिती घोडेगाव उपबाजारात शनिवारी झालेल्या लिलावात एक-दोन वकिलीसाठी पाच हजार रुपयांचा भाव मिळाला आहे. तर सरासरी चार हजार ते चार हजार तीनशे रुपये असा भाव मिळालेला आहे. नवीन कांद्याला 4500 रुपये असा भाव मिळाला आहे. सरासरी गावरान कांद्याला 4000 ते चार हजार पाचशे रुपये असा भाव मिळालेला आहे. (Onion Market Update)