पावसाची वाट बघता बघता शेतकऱ्यांना दिलासा! पीएम किसानचा 20 वा हप्ता ‘या’ दिवशी खात्यात येणार?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan 20th installment date | सध्या पावसाची थांबलेली पावसधार आणि रखडलेल्या पेरण्या यामुळे शेतकरी चिंतेत आहे. कुठे आधीच पेरण्या झाल्या, तर कुठे अजूनही शेत वाफसा होण्याची वाट बघतोय. काही ठिकाणी तर दुबार पेरणीची वेळ आली आहे. अशा कडेलोटाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना कुठल्याही आर्थिक मदतीची गरज आहे  अगदी दोन हजार रूपये का असेनात, पण हप्त्याची प्रतीक्षा साऱ्यांनाच आहे.PM Kisan 20th installment date

हे पण वाचा |  मोठी बातमी ! तुम्हाला आला का शेतकरी ओळखपत्र ID क्रमांक असं करा चेक 

 पीएम किसानचा 20 वा हप्ता कधी जमा होणार?

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणारा २० वा हप्ता जून महिन्याच्या अखेरीस मिळेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, जुलै उजाडला तरी अनेकांच्या खात्यात हा हप्ता जमा झालेला नाही. या पार्श्वभूमीवर १८ जुलै ही तारीख शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरू शकते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १८ जुलै रोजी बिहार दौरा आहे. ते मोतीहारी येथे एक सभा घेणार आहेत. अशा वेळेस अनेकदा पंतप्रधानांकडून मोठ्या योजनांचे लोकार्पण किंवा निधी वितरण होत आले आहे. त्यामुळे याच दिवशी पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर डिजिटल पद्धतीने जमा होण्याची शक्यता दाट आहे.

हे पण वाचा | PM किसान योजनेच्या 20व्या हप्त्याचे 2,000 रुपये हवे आहेत? मग ‘हे’ काम लगेच करा!

 तुम्ही लाभार्थी आहात का? इथे फटाफट तपासा!

संपूर्ण देशभरात लाखो शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो. मात्र, फक्त लाभार्थ्यांच्या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनाच हप्ता दिला जातो. त्यामुळे तुमचं नाव यादीत आहे की नाही हे त्वरित तपासणं गरजेचं आहे.

1. 👉 pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा

2. 👉 “शेतकरी कॉर्नर” वर क्लिक करा

3. 👉 “लाभार्थ्यांची यादी” (Beneficiary List) निवडा

4. 👉 तुमचा आधार क्रमांक / मोबाईल नंबर / बँक खाते क्रमांक टाका

5. 👉 “Get Data” वर क्लिक करा आणि तुमचा Payment Status तपासा

📞 काही अडचण असल्यास इथे करा तक्रार

ई-केवायसी पूर्ण झालेली नसेल तर हप्ता थांबवला जातो

खातं आधारशी लिंक असणं आवश्यक

योजनेविषयी तक्रार असल्यास PM-Kisan हेल्पलाइन:

📞 1800-115-5525

📞 155261

📞 011-24300606

 एका कुटुंबात आता फक्त एकालाच लाभ!

सरकारने आता या योजनेत एक मोठा बदल केला आहे. नवीन नियमानुसार, पती-पत्नी, मुलगा-मुलगी यापैकी फक्त एका सदस्यालाच लाभ मिळणार आहे. म्हणजेच एका कुटुंबात एकापेक्षा जास्त सदस्य या योजनेचा फायदा घेऊ शकणार नाहीत.

हे पण वाचा | PM किसान योजनेच्या 20व्या हप्त्याचे 2,000 रुपये हवे आहेत? मग ‘हे’ काम लगेच करा!

 पावसाची ओढ, संकटाची वेळ… पण थोडं तरी आर्थिक बळ हवं!

बेराणीचं संकट असो, पेरण्या वाया गेल्याचं दुःख असो, की बी-बियाणं पुन्हा घेण्याची चिंता… अशा वेळी सरकारकडून मिळणारा पीएम किसानचा दोन हजारांचा हप्ता म्हणजेच थोडा दिलासा. काहीसावडू म्हणून वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने लवकरात लवकर ही रक्कम द्यावी, हीच अपेक्षा.

Disclaimer:

वरील माहिती ही विविध माध्यमांमधून संकलित असून, अद्याप केंद्र सरकारकडून यासंबंधी अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. शेतकऱ्यांनी pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून अधिकृत अपडेट तपासावेत.

अश्याच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment