फक्त १००० रुपयांत सुरक्षित गुंतवणूक, मिळवा ११ लाखांहून अधिक व्याज! सरकार देते खात्रीची हमी”


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

post office scheme : आजच्या काळात महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोणतीही गोष्ट स्वस्त उरलेली नाही. अशा वेळी सामान्य माणसाने भविष्याची आर्थिक तजवीज करणे अत्यावश्यक आहे. कारण गरज जेव्हा उंबरठ्यावर उभी राहते, तेव्हा हातात काहीच नसल्याचं दुःख फार मोठं असतं. त्यामुळेच सरकारने सामान्य जनतेसाठी काही अशा योजना सुरू केल्या आहेत, ज्या फक्त सुरक्षित नाहीत तर खात्रीशीर परतावाही देतात. त्यातलीच एक जबरदस्त योजना म्हणजे पोस्ट ऑफिस नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC).

हे पण वाचा| बँकांनी व्याजदर कपातले, पण पोस्ट ऑफिस देतंय 7.50% व्याज  2 लाखांवर तब्बल 29,776 रुपये रिटर्न! 

पोस्ट ऑफिसची खात्रीशीर योजना

ही योजना पोस्ट ऑफिसमार्फत चालवली जाते. या योजनेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे सरकारकडून मिळणारी परताव्याची गॅरंटी. म्हणजेच तुमचं पैसे कुठे गेले, परत मिळतील का, याचा विचार करण्याची गरज नाही. सरकार तुमचं पैसे सुरक्षित ठेवतं आणि ठरलेल्या वेळेनंतर चक्रवाढ व्याजासह परत करतं.

किती व्याज मिळतं?

सध्या या योजनेत ७.७% चक्रवाढ व्याजदर लागू आहे. व्याज तिमाही आधारावर मोजलं जातं. म्हणजे दर तीन महिन्यांनी तुमच्या गुंतवणुकीवर व्याज जमा होतं. आणि त्यावर पुन्हा व्याज मिळतं.

गुंतवणुकीची सुरुवात फक्त १००० रुपयांत!

या योजनेत गुंतवणुकीची सुरूवात फक्त १००० रुपयांत करता येते. विशेष म्हणजे या योजनेत जास्तीत जास्त गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही. तुम्ही जितके पैसे टाकाल, तितका जास्त परतावा मिळेल.

हे पण वाचा| बँकांनी व्याजदर कपातले, पण पोस्ट ऑफिस देतंय 7.50% व्याज  2 लाखांवर तब्बल 29,776 रुपये रिटर्न! 

५ वर्षांचा लॉक इन कालावधी

या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर ५ वर्षांपर्यंत ती रक्कम काढता येत नाही. म्हणजेच तुमची गुंतवणूक सुरक्षित राहते आणि त्यावर दरमहा व्याज जमा होतं.

कर सवलतीचं खास फिचर

या योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला टॅक्स बेनिफिटही मिळतो. म्हणजेच IT Act 80C अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर टॅक्स सवलत मिळते. म्हणजे पैसा सुरक्षित, व्याज जास्त आणि करातही सूट – तीनही गोष्टी एकाच योजनेत.

फक्त मोठी गुंतवणूकच नाही, मोठा परतावाही

समजा तुम्ही या योजनेत २५ लाख रुपयांची गुंतवणूक केली, तर ५ वर्षांनंतर तुम्हाला एकूण ३६,४७,५८२ रुपये मिळतात. त्यातले ११,४७,५८२ रुपये फक्त व्याजरूपाने मिळतात. हा परतावा इतर कोणत्याही खासगी योजनेत मिळणं जवळपास अशक्य आहे.

सिंगल आणि जॉइंट दोन्ही प्रकारे अकाउंट

तुम्ही या योजनेत एकट्याने किंवा तुमच्या जोडीदारासोबत सुद्धा अकाउंट उघडू शकता. तसेच जर १८ वर्षांखालील मुलांचं अकाउंट उघडलं, तर ते १८ वर्षांनंतर मॅच्युअर होतं. भविष्यात मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी किंवा कोणत्याही गरजेसाठी उपयोगी ठरतं.

अश्याच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment