Railway News | महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. विशेषतः मुंबई ते पुणे आणि पुणे ते मुंबई अशा दोन्ही शहरांदरम्यान दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी ही बातमी विशेष महत्त्वाची ठरणार आहे. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी असून पुणे हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखलं जातं. या दोन शहरांमध्ये शिक्षण, रोजगार, व्यवसाय आणि वैद्यकीय कारणासाठी दररोज लाखो लोकांचा प्रवास सुरू असतो. रस्तेमार्गासह रेल्वे मार्गावरही तितकीच गर्दी आणि प्रवासीभार दिसून येतो. हाच मुद्दा लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने एक महत्वाकांक्षी पाऊल उचललं असून, या पावलामुळे येत्या काळात प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. Railway News
रेल्वे प्रशासनाने कर्जत ते तळेगावदरम्यान चौथी व पाचवी नव्या रेल्वेमार्गिकांची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गिका तयार करण्यासाठी जवळपास ९ हजार कोटी रुपयांचा खर्च होणार असून त्यासाठी केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयामार्फत विशेष निधी मंजूर करण्याची तयारी सुरू आहे. या प्रकल्पात एकूण ६० किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग तयार होणार आहे आणि या मार्गात तब्बल ४३ किलोमीटरचे बोगदे बांधण्यात येणार आहेत. विशेष बाब म्हणजे या बोगद्यांपैकी एक बोगदा ३० किलोमीटरचा असणार असून, तो देशातील सर्वात लांब रेल्वे बोगदा ठरणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून समोर आली आहे.
सध्या मुंबई ते पुणे रेल्वे प्रवासासाठी घाटमाथ्यावरून गाडी पार करत असल्याने रेल्वेला अतिरिक्त इंजिन जोडावे लागते. त्यामुळे इंधनाचा अपव्यय, वेळेचा खर्च आणि यंत्रणांवरचा ताण वाढतो. याच अडचणी टाळण्यासाठी हा बोगद्यातून सरळ मार्ग काढण्याचा विचार केला जात आहे. या नव्या रेल्वे प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ थेट अर्ध्या तासाने कमी होणार आहे आणि त्यामुळे प्रवाशांना वेगवान, आरामदायक आणि वेळ वाचवणारी सेवा मिळणार आहे.
या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला असून तो रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. एकदा मंजुरी मिळाली की तात्काळ या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, कर्जत ते खोरावडी दरम्यानही नव्या मार्गिकेचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून त्याचाही आराखडा तयार करण्यात येणार आहे. यामुळे केवळ मुंबई-पुणेच नव्हे, तर महाराष्ट्रातील इतर भागांशी जोडणारे रेल्वे मार्ग अधिक गतीमान, सुरक्षित आणि आधुनिक होणार आहेत.
ही योजना पूर्णत्वास गेल्यानंतर महाराष्ट्राचा पायाभूत विकास अधिक भक्कम होणार असून, केवळ प्रवासच नाही तर उद्योग, व्यापार, पर्यटन आणि शिक्षणाच्या क्षेत्रालाही नवसंजीवनी मिळणार आहे. देशातील सर्वात मोठा रेल्वे बोगदा आपल्याच राज्यात होणार असल्याचा अभिमान वाटावा असा हा क्षण असून, या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. प्रवाशांच्या सेवेसाठी सरकारने उचललेलं हे पाऊल भविष्यात लाखो लोकांच्या प्रवासाला सुलभ आणि आनंददायी बनवणार यात शंका नाही.
हे पण वाचा | लाडक्या बहिणीसाठी मोठी बातमी! आता या लाडक्या बहिणींना मिळणार नाही एप्रिल महिन्याचा हप्ता