Today’s Horoscope: आज या राशींवर शनीदेवाची कृपा होणार; वाचा आजचे तुमचे राशिभविष्य

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Today’s Horoscope: आजचा दिवस म्हणजे एक खास योगायोगाचा क्षण आहे. २४ मे २०२५, शनिवार, वैशाख महिन्याचा कृष्ण पक्ष आणि त्यातही द्वादशी तिथी म्हणजेच शनिप्रदोष व्रत. हाच तो दिवस, जेव्हा शनीदेव आपली विशेष कृपा आपल्या भक्तांवर करतात. संध्याकाळी ७.२१ वाजेपर्यंत द्वादशी असेल आणि त्यापूर्वी संपूर्ण दिवस आपल्याला शनीदेवाचे स्मरण करत उपासना करण्याचा योग मिळतो. आज चंद्र मीन राशीत असून रेवती नक्षत्रात आहे, त्यामुळे काही राशींसाठी आजचा दिवस अत्यंत फलदायी ठरणार आहे. चला तर पाहूया आजच्या या शुभदिनी कोणत्या राशीवर शनीदेव प्रसन्न होणार आहेत आणि कोणाला घ्यावी लागेल थोडी अधिक काळजी…

हे पण वाचा | पावसाचा धडाका! पुढील 24 तास महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाचे, घराबाहेर पडताना दोनदा विचार करा

  • मेष:

आजचा दिवस तुम्हाला साथ देणारा आहे. कामात यश, जोडीदाराकडून सहकार्य आणि मनासारखी कचेरीची कामगिरी होईल. कुठलाही निर्णय घेण्याआधी कागदपत्रे नीट तपासून पाहा. तुमचं सौम्य बोलणं आज लोकांच्या मनाला भिडेल.

  • वृषभ:

जोडीदाराकडून भावनिक आणि आर्थिक मदत मिळेल. पण मित्रांशी गैरसमज होऊ नये म्हणून शब्द जपून वापरा. देवाच्या कामात हातभार लावा, मनःशांती मिळेल.

हे पण वाचा | पोस्ट ऑफिस च्या ‘या’ योजनेतून फक्त व्याजातूनच मिळणार 3 लाख रुपये नफा! कशी करावी गुंतवणूक? जाणून घ्या सविस्तर

  • मिथुन:

आज तुम्ही थोडं अस्वस्थ वाटू शकता. दुसऱ्यांवर अवलंबून न राहता स्वतःहून पुढाकार घ्या. वेळ वाया घालवणाऱ्या गप्पांपासून दूर राहा. थोडा संयम ठेवा, यश नक्कीच मिळेल.

  • कर्क:

घरात प्रेमाचं वातावरण असेल पण काही गोष्टी मनात ठेवू नका. तुमचं हास्य, खेळकर स्वभाव आज अनेकांना आनंद देईल. प्रकृतीकडे दुर्लक्ष नको.

हे पण वाचा | पीक विमा योजनेतून ‘हे’ शेतकरी अपात्र! काय आहे कारण? वाचा सविस्तर..

  • सिंह:

जवळचं प्रवास घडेल. वाहनसुख मिळेल आणि कुटुंबातील मोठ्यांचा आशीर्वाद लाभेल. पण जोडीदाराशी थोडं समजून घेणं आवश्यक आहे.

  • कन्या:

कामात गोंधळ होऊ नये यासाठी नियोजन करा. घरात आनंदाचे क्षण असतील. चविष्ट जेवण मिळेल. पण अनपेक्षित बदलांची तयारी ठेवा. Today’s Horoscope

हे पण वाचा | पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज! मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार

  • तूळ:

धनलाभाचा योग आहे. प्रवास फायदेशीर ठरेल. आज लोक तुमच्या व्यक्तिमत्त्वाकडे आकर्षित होतील. मेहनत अधिक घ्यावी लागेल, पण त्याचं फळ नक्की मिळेल.

  • वृश्चिक:

थोडी मनाची चंचलता जाणवेल. पती किंवा पत्नीच्या मताला मान द्यावा लागेल. कुटुंबासाठी केलेली मदत तुम्हाला आनंद देईल. भागीदारीतून फायदा होईल.

हे पण वाचा | तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी ‘मे’ चा शेवटचा आठवडा ठरणार भाग्याचा..

  • धनु:

तुमच्या बोलण्यात आज जादू असेल. नवीन संधी मिळतील पण त्या हाताळताना सावध राहा. घरात खर्च वाढू शकतो त्यामुळे पैशाच्या बाबतीत नियोजन गरजेचं आहे.

  • मकर:

कामाची गती वाढेल. मधुर बोलणं तुमचं मोठं हत्यार ठरेल. हातातली कामं वेळेत पूर्ण होतील. कमाईत वाढ होईल.

हे पण वाचा | Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! सोन्याचे नवीन दर जाणून घ्या…

  • कुंभ:

घरात तुमचा दबदबा असेल पण त्याचा अहंकार करू नका. आर्थिक व्यवहार करताना चोख विचार करा. समाजकार्य किंवा ज्ञानवृद्धीत रस घ्या.

  • मीन:

तुमचं मन थोडं अधीर असेल. कामात गडबड होण्याची शक्यता आहे. पण घरचं वातावरण खेळकर असेल. वरिष्ठ तुमचं कौतुक करतील, त्यामुळे आत्मविश्वास वाढेल.

हे पण वाचा | लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! या तारखेला मिळणार 11 व्या हप्त्याचे 1,500 रुपये?

शनीदेव हा कर्माचा न्यायाधीश मानला जातो. तो कुणावर रागावतो, कुणावर कृपा करतो याचा निर्णय आपल्या कर्मावरच अवलंबून असतो. आज शनिप्रदोष आहे, उपासना, संयम, सेवा आणि सत्कर्माच्या माध्यमातून आपणही शनीदेवाची कृपा मिळवू शकतो. काही क्षण स्वतःसाठी राखा, मनाला विचार करा — मी आज काय चांगलं केलं?

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “Today’s Horoscope: आज या राशींवर शनीदेवाची कृपा होणार; वाचा आजचे तुमचे राशिभविष्य”

Leave a Comment