Tractor anudan Yojana :- नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांसाठी सरकार अनेक योजना राबवत आहे. भारत देश हा एक कृषी प्रधान देश आहे या देशातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे त्यामुळे सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना देत आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा घेता यावा. अशीच एक योजना म्हणजे ट्रॅक्टर अनुदान योजना या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील शेतकऱ्यांसाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे.
मिनी ट्रॅक्टर योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
या समाजातील शेतकऱ्यांना चालना देण्यासाठी शेती काम सोपे करण्यासाठी सरकार मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना राबवित आहे. या योजनेअंतर्गत बचत गटांना 90% अनुदान वर ही ट्रॅक्टर योजना देण्यात येत आहे त्याचबरोबर उपसाधने देखील देण्यात येत आहे त्यामुळे आता शेती आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून करण्याचे उद्दिष्ट सरकारचे आहे.
मिनी ट्रॅक्टर योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
शेतकऱ्यांसाठी सरकारने ही योजना 2017 च्या शासन निर्णय नुसार आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पन्नामध्ये सुधारणा व वाढ व्हावी यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेचे माध्यमातून शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीचे तुलनेपेक्षा अधिक उत्पादन घेण्यासाठी सरकार ट्रॅक्टरच्या साह्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची आम्हाला गती वाढवण्याचे काम करत आहे.
हे पण वाचा :- सातबारा वरील नाव चुकले आहे, किंवा इतर चुका आहेत का? ही सोपी पद्धत वापरून करा दुरुस्त
मिनी ट्रॅक्टर शेतकरी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर योजना घेण्यासाठी एकूण रक्कम लागत आहे 3,50,000 हजार रुपये यापैकी शासनाकडून शेतकऱ्यांना 3,15,000 रुपये रक्कम अनुदान म्हणून दिले जाते व शेतकऱ्यांना फक्त 35,000 हजार रुपये रक्कम भरावी लागत आहे.
तुम्हाला या योजनेला ऑनलाईन प्रकारे अर्ज करायचा अर्ज करण्यासाठी तुम्ही वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून या योजनेला अर्ज करू शकता. अर्ज केल्यानंतर तुमची निवड लॉटरी पद्धतीने केली जाणार आहे याचा अर्थ म्हणजे पात्र अर्जदाराकडून लॉटरी काढून निवड केली जाईल व त्याला अनुदान मंजूर करण्यात येणार आहे.
हे पण वाचा :- सातबारा वरील नाव चुकले आहे, किंवा इतर चुका आहेत का? ही सोपी पद्धत वापरून करा दुरुस्त
3 thoughts on “ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी मिळणार 90% अनुदान ? शेतकऱ्यांसाठी सरकार राबवत आहे ही योजना ”