Weather Forecast: राज्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबई मध्य महाराष्ट्र आणि कोकण पट्ट्यामध्ये गेल्या 24 तासापासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील ही स्थिती कायम राहणार असून पुढील पाच दिवसांमध्ये राज्याच्या बहुतांश भागांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट सांगितले आहे. राज्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हे पण वाचा | लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! 11 व्या हप्त्याचे 1,500 रुपये या तारखेला खात्यात जमा होणार?
मान्सूनच्या आगमनासाठी अरबी समुद्रात पूरक स्थिती निर्माण होत असतानाच देशात आता मान्सूनपूर्व पावसाने जबरदस्त हजेरी लावल्याचे दिसत आहे. मान्सून पूर्वीचा पाऊसच राज्यात जोरदार धुमाकूळ घालताना दिसत आहे. याच धरतीवर हवामान विभागांना पुढील चार ते पाच दिवस राज्यात वादळी वाऱ्याचा पाऊस पडणार असल्याचा इशारा जारी केला आहे. प्रामुख्याने नाशिक अहिल्यानगर सातारा पुणे कोल्हापूर या भागात वादळी पावसाची शक्यता आहे. विदर्भ मराठवाडा आणि कोकण पट्टा सुद्धा या पावसात झोडपण्याची शक्यता आहे. Weather Forecast
मेघगर्जनेसह आणि विजेच्या कडकडाटासह राज्यात जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील कोकणासोबत मध्य महाराष्ट्रात अति मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. तर विदर्भातील काही ठिकाणी पाऊस जोरदार बरसणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सध्या गुजरात आणि उत्तर कोकणाच्या किनाऱ्यालगत अरबी समुद्रात चक्रकार वारे वाहत आहे. या वाऱ्याची दिशा आणि वेग पाहता सध्या राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना दिसत आहे. मानसून पूर्वीचा हा पाऊस लवकर राज्यातून परतणार नसून किमान 21 मे पर्यंत पावसाचा जोर वाढत राहणार असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हे पण वाचा | सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी! सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण; पहा आजचे दर..
राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून ठीक ठिकाणी मुसळधार पावसाने शेती पिकाचे आणि फळबाग पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केलेले दिसत आहे. हे संकट आणखीन काही दिवस टिकणार असून हवामान विभागाने पुणे शहरासह जिल्ह्यातील आणि राज्यातील घाट परिसरात असणाऱ्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रात सध्या पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही भागांमध्ये पावसाच्या सरी इतक्या जोर धरतील की त्यापासून नागरिकांना हानी होण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याने जारी केला आहे.