Gold Rate Today: सध्या सराफा बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात सतत चढ-उतार सुरू आहेत. पण, ५ जून रोजी या दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये किंचित वाढ झाली आहे. विशेषतः, २४ कॅरेट आणि २२ कॅरेट सोन्याच्या दरात केवळ १० रुपयांची वाढ दिसली आहे, तर चांदीच्या दरात मात्र १०० रुपयांनी वाढ झाली आहे.
हे पण वाचा| मोठी बातमी! लाडक्या बहिणीना मे महिन्याचे ₹1500 जमा होण्यास सुरुवात; तुमच्या खात्यात आले का?
आज ५ जून रोजी, देशातील मोठ्या शहरांमध्ये २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ₹९९,९०० आहे. तर, दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ₹९१,०६० आणि २४ कॅरेट सोन्याचा भाव ₹९९,३३० प्रति १० ग्रॅम आहे. मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा दर ₹९०,९१० आहे, तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ₹९९,१८० प्रति ग्रॅम आहे.
चांदीच्या दरात चमक कायम
सोन्यापेक्षा चांदीच्या दरात जास्त वाढ झाली आहे. ५ जून रोजी चांदीचा भाव ₹१,०२,१०० प्रति किलो आहे. कालच्या तुलनेत चांदीचा दर ₹१०० ने वाढला आहे. ४ जून रोजी एक किलो चांदीचा दर ₹१,०२,००० होता. Gold Rate Today
हे पण वाचा | लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याबाबत आदिती तटकरे यांच्याकडून मोठी अपडेट समोर..
सोन्याची किंमत कशी ठरवली जाते?
सोन्याची किंमत अनेक गोष्टींवर अवलंबून असते. २४ कॅरेट सोनं हे सर्वात शुद्ध मानलं जातं, तर २२ कॅरेट सोनं दागिने बनवण्यासाठी वापरलं जातं. भारतात सोन्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारातील दर, सरकारचे कर आणि रुपयाच्या मूल्यावर अवलंबून असते.
सोनं फक्त एक गुंतवणूक नाही, तर ते आपल्या परंपरा आणि सणांचा एक महत्त्वाचा भाग आहे. लग्न आणि सणांच्या वेळी सोन्याच्या दागिन्यांची मागणी वाढते. त्यामुळे, सोन्याच्या दरातील बदल नेहमीच महत्त्वाचे ठरतात. तुम्हीही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर आजचे दर लक्षात घेऊन योग्य निर्णय घेऊ शकता.
3 thoughts on “Gold Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात आज काय बदल? जाणून घ्या आजचे ताजे भाव!”