लाडक्या बहिणींनी लुटले सरकारचे 5100 कोटी रुपये ! आता राज्य सरकार या महिलांवर कारवाई करणार का ?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana Maharashtra : महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेत मोठा गैरप्रकार करून आला आहे. या योजनेअंतर्गत जेव्हा पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली त्यावेळेस राज्यात तब्बल 24 लाख 30000 अपात्र महिला बाहेर पडले आहेत या महिलांनी सरकारचे तब्बल 5100 कोटी रुपये लुटले आहे. एवढेच नव्हे तर पुण्यामध्ये असा प्रकार देखील घडला आहे की जिल्हा परिषदेतील 54 महिला सरकारी कर्मचारी असून सुद्धा या लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतला आहे. Ladki Bahin Yojana Maharashtra

हे पण वाचा | “या महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचे पैसे? सरकारचा मोठा निर्णय, लाखो महिलांना बसणार फटका!”

महिला आणि बालविकास विभागाच्या तपासणीनंतर हा गैरप्रकार समोर आला आहे. हा प्रकार व उघडीस आल्यानंतर आता आपात्र झालेल्या महिलांच्या खात्यावरती पैसे पाठवण्यास थांबवले आहे. यानंतर सरकारने कठोर कारवाईची संकेत देत योजनेमध्ये आणखीन तपासणी प्रक्रिया सुधारण्यात निर्णय दिले आहेत. ही योजना तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे चालू उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुलै 2024 मध्ये सुरू केली होती.

राज्यातील गरीब व गरजू महिलांसाठी ही योजना राबवली होती परंतु या योजनेचा गैरफायदा घेत अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. राज्यामध्ये एकूण दोन कोटी 63 लाख महिलांनी या योजनेला नोंदणी केली होती व आता यापैकी दोन कोटी किती लाख महिला हे पात्र ठरविण्यात आले आहेत. त्याचबरोबर ही योजना सुरू करता वेळेस कोणतीही पडताळणी केली नव्हती परंतु जेव्हा निवडणुकी पार पाडल्या त्यानंतर या योजनेची पडताळणी सुरू केली व यामध्ये अनेक अर्ज अपात्र ठरले आहेत.

राज्याच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची कठोर पडताळणी केल्यानंतर, राज्य मध्ये तब्बल 26 लाख 30000 महिला अपात्र ठरविण्यात आले आहे. या पत्र झालेल्या महिलांना योजनेच्या सुरुवातीपासून दरमहा या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत आतापर्यंत अपात्र महिलेने 5100 कोटी रुपयाची रक्कम अपात्र लाभार्थ्यांनी घेतलेली आहे.

हे पण वाचा | सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटले अजित पवारांनी मान्य केलं चूक अदिती तटकरे म्हणाल्या  “मे महिन्याचा हप्ता लवकरच!”

योजनेच्या या आर्थिक वर्षाच्या बजेटमध्ये दहा हजार कोटी रुपये इतकी रक्कम या योजनेसाठी राखीव ठेवण्यात आली होती. पण आपात्रावर झालेल्या खर्च यापेक्षा जास्त असल्याने प्रारंभिक तपासणी प्रक्रियेत प्रश्नपत्रिकेत आहे एकूण योजनेत आतापर्यंत 29 हजार कोटी रुपये खर्च झाला आहे त्यातील मोठा भाग म्हणून अपात्र महिलेंना खर्च झाला आहे.

पुढील हप्ता कधी येणार ?

महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितले की अपात्र खात्यांवरील पैसे देणे बंद करण्यात आले आहेत. या प्रकरणाची सकल चौकशी सुरू असून जबाबदार व्यक्तीवर कठोर कारवाई होणार आहे सरकारने यानंतर कठोर पावले उचलली आहे अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे पाठवणे बंद करण्यात आले आहे. आता चौकशी पूर्ण होईपर्यंत योजनेच्या पुढील टप्प्यावर परिणाम होऊ शकतो तसेच तपासणी प्रक्रिया मध्ये अजून सुधारणा करण्याचे मार्गदर्शक तत्वे तयार करण्यात आले आहे.

टीप : आम्ही वर दिलेली माहिती विविध प्रसार माध्यमाच्या आधारावरून घेतलेले आहे, ही बातमी फक्त वाचकांना माहिती पोहोचणे या मागचे हेतू आहे.

2 thoughts on “लाडक्या बहिणींनी लुटले सरकारचे 5100 कोटी रुपये ! आता राज्य सरकार या महिलांवर कारवाई करणार का ?”

Leave a Comment