शेतकरी कर्जमाफीची यादी जाहीर? असा सोशल मीडियावरती फेक दावा सरकारकडून स्पष्टता

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Loan Waiver News : सध्या शेतीविषयक बातम्या मोठ्या प्रमाणामध्ये वायरल होत आहे आणि त्याचं कारण म्हणजे सोशल मीडिया सोशल मीडियावरती सध्या अनेक अशा बातम्या प्रसार होत आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना खोटी कोणती खरी कोणती याची माहिती होत नाही. सध्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून वारंवार एक प्रश्न उपस्थित केला जातो, तो म्हणजे सरकार कडून देण्यात येणाऱ्या कर्जमाफीचा फायदा आम्हाला कधी होणार? पण याचाच काही लोक फायदा घेऊन शेतकऱ्यांना वेड्यात काढतात आणि कुठली यादी आहे आमचं नाव का नाही यामध्ये? त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये गैर समज निर्माण होतो आणि शेतकऱ्यांना वाटत की, यांना लाभ भेटत आहे आम्हाला भेटत नाही तर याच गोष्टीवरती शासनाने पुन्हा एकदा पष्टता दिली आहे. Loan Waiver News

कर्जमाफी बाबत सोशल मीडियावरती फेक दावा

सध्या शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात, या योजनेचा योग्य प्रकारे आणि शेतकऱ्यांनाच लाभ व्हावा यासाठी शासनाने अनेक तत्पर मोहीम राबवली आहे. अफवेचे महत्त्वाचे कारण म्हणजे शासनाने मध्यंतरी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी पुण्यश्लोक आहिल्यादेवी कर्जमाफी योजना राबवली जाणार घोषणा केली होती. या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना दोन लाख रुपये पर्यंत कर्ज देण्यात येणार होते. याबाबत आता झालेल्या अधिवेशनामध्ये देखील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार आहे अशी लेखी माहिती संबंधित मंत्र्यांनी दिली आहे. परंतु शासनाने याबाबत अजून कुठलाही ठोस निर्णय घेतलेला नाही. यामुळे शेतकऱ्यांना देखील प्रश्न पडलेले आहेत की कर्जमाफी कधी होणार आमच्या सातबारा कधी कोरा होणार. परंतु याबाबत सोशल मीडियावरती अनेक फेक दावे उपस्थित केले जातात. “शासनातर्फे कर्जमाफी जाहीर यादीमध्ये तुमचे नाव तपासा, जर यादीमध्ये तुमचे नाव नसेल तर तुम्हाला कर्जमाफी मिळणार नाही, असे देखील फेक अफवा पसरवल्या जात आहेत.” याच दाव्यावरती सरकारने, स्पष्ट माहिती दिली आहे तर सरकारची भूमिका काय याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत.

कर्जमाफी बाबत सरकारची स्पष्टता

सध्या सोशल मीडियावरती शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत अनेक फेक दावे केले जात आहेत याच पार्श्वभूमी वरती सरकारने त्यांच्या हँडल वरती अधिकृत माहिती देत म्हटले आहे की शेतकरी कर्जमाफीची नवीन लाभार्थी यादी जाहीर झालेली नाही याबाबत असणारा दावा खोटा आहे तसेच, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्त योजना 2026 अंतर्गत अंतिम लाभार्थ्यांची अद्याप्रसिद्ध करण्यात आलेली नाही. त्यामुळे पात्र असणारे शेतकऱ्यांची माहिती संकलित करून त्याची पडताळणी करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यामुळे कोणतीही अधिकृत यादी अद्याप जाहीर झालेली नाही, तसेच शेतकऱ्यांनी कुठल्याही अफवे वर विश्वास ठेवू नये तसेच जर सरकारने अशी कुठलीही यादी जाहीर केली तर ते त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करते. त्यामुळे अशा कुठल्याही अफेवरती विश्वास न ठेवता शेतकऱ्यांनी सरकारच्या निर्णयाकडे लक्ष ठेवले पाहिजे.

(अशाच शेतीविषयक बातमी जाणून घेण्यासाठी आम्हाला फॉलो करत चला आणि व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर शासनाच्या अधिकृत निर्णयांची माहिती होईल.)

Leave a Comment

error: Content is protected !!