Maharashtra Hawamaan update | 18 जुलैपासून हळूहळू महाराष्ट्रातील वातावरण बदलायला सुरुवात झाली आहे, अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावलेली आहे. अशातच पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याचा मोठा( IMD) अंदाज शेतकऱ्यांसाठी आनंदाचा ठरणार आहे. भारतीय हवामान खाते राज्याच्या हवामानाबाबत मोठी अपडेट दिल्यामुळे नक्की शेतकऱ्यांच्या मनामध्ये आनंद निर्माण झाला असेल चला तर जाणून घेऊया नवीन अंदाज काय आहे.
कालपासून मुंबईकरांच्या धावपळी सोबत आता छत्र्यांची देखील सुरुवात झाली आहे. रात्रभर गडद आभाळ पाहायला मिळाले. गेले काही दिवसांपासून उदास आणि दमट वातावरणामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले होते. परंतु आता मातीचा तो सुगंध पुन्हा दरवळू लागला आहे. हवामान विभागाने आज सकाळच्या सात च्या सुमारास जो अंदाज जाहीर केला आहे. त्याच्यानुसार हा आठवडा संपूर्ण राज्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. कारण या अंदाज मध्ये पावसांच्या सरी सोबत विजांच्या कडकडाटसह जोरदार हजेरी लावणार आहे. Maharashtra Hawamaan update
या पावसा मागचं कारण हे तितकच रंजक आहे, राजस्थानच्या श्री गंगानगर पासून थेट रोहक, हरदोई, वाराणसी रांची मार्गे बंगालचे उपसागरापर्यंत आभाळात दीड किलोमीटर उंचीवर एक विस्तीर्ण कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. या जोडीला मध्य प्रदेशातील साडेतीन किलोमीटर उंचीवर आणि आंध्र प्रदेश छत्तीसगड सीमेवर जवळपास सहा किलोमीटर उंचीवर वाऱ्यांचे चक्र फिरू लागलेला आहे. या साऱ्या हालचालीमुळे महाराष्ट्राच्या मोसमी वारे पुन्हा जोमाने वाळू लागले आहेत आणि म्हणूनच जुलै च्या पहिल्या आठवड्यापासूनच थकलेला पावसाचा पुन्हा दुसरी इनिंग सुरू करत आहे. यामुळेच राज्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू होऊ शकते.
आजचे हवामान अंदाज | 21 फेब्रुवारी 2026
राज्यातील या जिल्ह्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या नवीन अपडेट नुसार, मुंबई आणि ठाणे या दोन जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जाहीर केलेला असून सोमवारी दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. जे लोक लोकलने प्रवास करतात त्यांनी छत्री सोबत ठेवावी आणि शक्य असल्यास घराबाहेर पडताना थोडीशी स्वतःची काळजी घ्यावी. तसेच पुणे जिल्ह्यात देखील घाटमाथ्यावरती आज जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे लोणावळा खंडाळा भागात फिरायला जाणाऱ्यांनी जरा जपूनच जावं.
कोकण किनारपट्टीची परिस्थिती ?
महाराष्ट्राचे इतर भागाप्रमाणे कोकण किनार्यावर परिस्थिती नव्हती कारण तिथे तुरळ पाऊस पडत होता. आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात हलक्या पावसाचा अंदाज वर्तमान झालेला आहे. तरी रायगड जिल्ह्याला मात्र मुसळधार पावसाचा सामना करावा लागणार आहे. असा इशारा देखील हवामान खात्याने दिलेला आहे. त्यामुळे त्या जिल्ह्यातील नागरिकांनी शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
खानदेश बाबत काय अंदाज?
भारतीय हवामान खात्याने उत्तर महाराष्ट्र आणि खानदेश बाबत एक मोठा अंदाज वर्तवलेला आहे. धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगर या भागात तुलनेने सोमी आणि हलका अपेक्षित पाऊस पडेल. नाशिकच्या शहरी भागात पावसाचा जोर कमीच राहील मात्र घाटमाथ्यावरती वादळी वाऱ्यांसह मध्यम पाऊस होऊ शकतो. तसेच जळगाव मध्ये देखील आज फारसा काही जोरदार पाऊस नसणार आहे असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रासाठी मोठा अंदाज?
भारतीय हवामान खात्याने कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या पट्ट्यात आज जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. सातारा घाटमाथा परिसरामध्ये मात्र थेट मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. या भागात पर्यटक आणि स्थानिक नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.
मराठवाड्याला देखील इशारा?
भारतीय हवामान खात्याने इतर भागांप्रमाणे छत्रपती संभाजी नगर, जालना आणि परभणी या जिल्ह्यात देखील आज विजांचा पावसाचा अंदाज वर्तवला आहे. बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात हलका पाऊस होऊ शकतो. गेले काही दिवस पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे.
परंतु विदर्भ कोरडाच?
राज्यभर पावसाने जोर लावला असला तरी विदर्भात अजूनही मनसोक्त पाऊस पडलेला नाही. रविवारी काही भागात तुरळ पाऊस पडला तरी सोमवारी विदर्भात पावसाची शक्यता फारच कमी आहे. भारतीय हवामान खात्याने अकोला अमरावती बुलढाणा, भंडारा चंद्रपूर गडचिरोली, गोंदिया नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यात वातावरण आज शांतच राहील तसेच हवामान विभागाने या भागासाठी कोणताही इशारा दिलेला नाही. सलग काही दिवस पावसाच्या लांबीमुळे विदर्भातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण वाढले आहे पेरलेले पीक कुजून जाणार का पाऊस कधी पडणार असे आशाने शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत.
तर महाराष्ट्रासाठी हवामान खात्याने असा अंदाज वर्तवलेला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी या हवामान अंदाज आकडे व्यवस्थित लक्ष देऊन योग्य ते निर्णय आणि व्यवस्थित काळजी घेणे गरजेचे आहे तसेच पुढील हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करत चला आणि आम्हाला नक्कीच तुमची प्रतिक्रिया कळवा.
(टीप: वरील माहिती उपलब्ध हवामान वृत्तांच्या आधारे संकलित करण्यात आली आहे. तुमच्या जिल्ह्यासाठीचा नेमका आणि अद्ययावत इशारा भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अधिकृत संकेतस्थळावर किंवा अपवर जरूर तपासा.)
