Maharashtra Weather News : राज्यामध्ये पाऊस सध्या रौद्र रूप घेऊन आलेला आहे. मुंबई असो किंवा विदर्भ तसेच मराठवाडा या भागात जणू आभाळ फाटल आहे, असा पाऊस पडत आहे. यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांची देखील मोठी गैरसोय होत आहे. काही क्षणातच एवढा पाऊस कोसळतो की, समोरचं काहीही दिसत नाही. यामध्ये ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वाहणारे वारे पावसाचा मारा अजून तीव्र करत आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या इशारानुसार आजपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पुन्हा एकदा अतिवृष्टीचा धोका निर्माण झाला असून, नागरिकांमध्ये प्रचंड भीतीच वातावरण आहे. Maharashtra Weather News
मागील पंधरा दिवसांपासून राज्यावर अवकाळी पावसाचा प्रकोप सुरू आहे. शेतामध्ये जणू शेततळेच आहे, घर पाण्यात बुडाले आहेत, रस्ते वाहून गेले आहेत. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा या भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर आणि संपूर्ण मराठवाडा विदर्भाला येलो अलर्ट देण्यात आला आहे. प्रशासन सज्ज असलं तरी पावसाचा जो रीत का प्रचंड आहे की मदत पोहोचणे देखील कठीण जातंय.
राज्यामध्ये शनिवारी मध्ये रात्रीपासून सुरू झालेला मुसळधार पाऊस थांबायचं नाव घेत नाही. मुंबईमध्ये रात्रभर पाऊस पडत होता. अनेक ठिकाणी गटारी ओसडून वाहिली, असल्याने अनेक ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सप्टेंबर महिना समता समता पावसाचा परतीचा प्रवास सुरू होतो. मात्र यंदा हवामानाने पूर्णपणे उलट चित्र दाखवला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्र महाराष्ट्रावरती प्रचंड प्रभाव टाकत आहे. वाऱ्यांचे दिशा, चक्रकार स्थिती आणि सतत निर्माण होणाऱ्या हवामान बदलांमुळे पावसाचा जोर अजून वाढलाय. हवामान खात्याने सोमवारी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज दिलाय. मंगळवारपासून पावसाची तीव्रता कमी होईल असं म्हटलं जातंय, पण सध्या मात्र परिस्थिती गंभीर आहे.
शेतकऱ्यांची अवस्था तर वर्णतीत आहे. खरीप हंगामात पीक काढणीस आली होती, पण शेतात पाणीच साम्राज्य निर्माण झाले. सोयाबीन, कपाशी, मका या पिकांचे मोठ नुकसान झाला आहे. काही ठिकाणी शेतात उभ्या पिकांना कोंब फुटायला सुरुवात झाली. शेतकरी पंचनामाची वाट पाहतोय, व त्यांच्या डोळ्यात फक्त हातासपणा येत आहे. घरातील सगळ्या संसार उघड्यावर पडला, धान्य, जनावरांचा चारा सगळ वाहून गेलं.
दरम्यान, हवामान खात्याच्या प्राथमिक अंदाजानुसार ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत परतीच्या पावसाची हजेरी दिसेल. पण तोपर्यंत राज्यातील परिस्थिती सामान्य होणं अवघड दिसतय. नागरिकांना सतत सूचना देण्यात आलेल्या आहेत. अनावश्यक बाहेर पडू नका, नदी नाल्याजवळ जाऊ नका, सुरक्षित ठिकाणी थांबा. तरीही अनेक ठिकाणी लोकांना स्थलांतरित करावं लागत आहे. आता महाराष्ट्रातील चित्र कसे असेल यापुढचा काळच ठरवेल.
हे पण वाचा | पंजाबराव डखांचा मोठा हवामान अंदाज! या 11 जिल्ह्यांत जोरदार पाऊस, शेतीच्या बाबतीत दिलासा देणारी बातमी आलीय!