Punjab Dakh Havaman andaja : सध्या राज्यामध्ये एक वेगळीच परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्व शेतकऱ्यांचे लक्ष आता आभाळाकडे लागले आहे, अशातच पंजाब रावांचे एक मोठा हवामान अंदाज समोर आलेला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नक्कीच आशा पल्लवीत पडणार आहेत, परंतु पंजाबराव यांनी नेमकं काय आश्वासन दिले व कोणता हवामान अंदाज वर्तवलेला आहे. याची आपण सविस्तर माहिती जाणून घेण्याची प्रयत्न करूया त्यासाठी हा लेख सविस्तरपणे वाचा.
भारतीय हवामान खात्याप्रमाणे पंजाबराव (Punjab Dakh Havaman andaja) देखील एक हवामान अभ्यासाक आहे. ते देखील शेतकऱ्यांसाठी नेहमी हवामान अंदाज वर्तवत असतात. कधी त्यांचे हवामान अंदाज फेल जातात, तर कधी खरे ठरतात. परंतु ग्रामीण भागामध्ये पंजाबराव यांच्या हवामान अंदाजावरती शेतकऱ्यांचा मोठा गाढ विश्वास आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष पंजाबराव यांच्याकडे नक्की लागलेली असते. पंजाबराव त्यांच्या नवीन हवामान अंदाज मध्ये काय म्हणतात हे एकदा पण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
पंजाबराव यांनी हवामान विभागाच्या अंदाजाबरोबरच 30 जुलैपर्यंत राज्याला प्रत्येक भागात रोज कुठे ना कुठे पाऊस पडणार अशी शक्यता वर्तवली आहे. यामुळे नक्कीच शेतकऱ्यांना दिलासा देणारे बातमी ठरणार आहे.
याच पार्श्वभूमी वरती हवामान विभागांनी देखील ठाणे मुंबई आणि रायगड या तीन जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. म्हणजे पुढच्या काही तासात या भागात खरोखरच जोरदार पाऊस पडू शकतो.
विदर्भातील परिस्थिती?
हवामान अभ्यासाक पंजाबराव यांच्या मते, १९ ते २६ जुलै या आठवड्यात नागपूर, भंडारा, गोंदिया आणि अमरावती या चार जिल्ह्यांवरून एक चक्रीवादळ सरकणार असल्याचं डख यांनी सांगितला आहे. याचा परिणाम म्हणून या भागात तब्बल 300 ते 400 mm इतका प्रचंड पाऊस कोसळू शकतो. गेल्या अनेक दिवस कोरडा ठाक असलेला विदर्भासाठी जनु ही एक आनंदाची बातमी ठरणार आहे. आता पंजाबराव यांचा हवामान अंदाज किती खरा ठरतोय याकडे सर्व विदर्भाचे लक्ष लागले आहे.
तसेच सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी म्हणजे महाबळेश्वर भागाची. इथे चारशे ते पाचशे मी मी इतका अति मुसळधर पावसाची शक्यता पंजाबराव यांनी वर्तवली आहे. का पाऊस झाला तर राज्यातील एक महत्त्वाचं जलसाठा केंद्र असलेलं कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरू शकतो असा अंदाज त्यांचा आहे आणि कोयना भरण म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा अनेक भागातील पाणी प्रश्नाला मोठा दिलासा मिळणं.
मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रातील परिस्थिती
मराठवाड्यातील परभणी, लातूर, बीड, धाराशिव, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये रोज कुठे ना कुठे पाऊस पडत आहे. कुठे रिमझिम तर कुठे जोरदार सरी असं समिश्र वातावरण निर्माण झाल आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यात रोज वेगळे भागात जोरदार पावसाची शक्यता आहे असं पंजाबराव यांनी नमूद केला आहे.
उत्तर महाराष्ट्रासाठी पंजाब रावांचा अंदाज
उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे आणि जळगाव या जिल्ह्यात पावसाची चांगली शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मुंबई पुणे सह कोकण किनारपट्टी आणि घाटमाथा परिसरात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. म्हणजे शहरी भागातील नागरिकांनाही छत्री रेनकोट सोबत बाळगणे यापुढे काही दिवस गरजेचे आहे.
तसेच पुढे बोलत असताना त्यांनी एक महत्त्वाची बातमी दिली नांदेड आणि हिंगोली, धाराशिव, बीड, लातूर, परभणी या जिल्ह्यात ज्या गावात अजून पाऊस झाला नाही त्या गावात आता पाऊस चांगला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महिनाभर आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या या भागातील शेतकऱ्यांसाठी ही बातमी म्हणजे एक अंधारातून प्रकाशाकडे नेणारे आशा आहे.
( टीप: वरील अंदाज हवामान तज्ञ पंजाबराव डख Punjab Dakh Havaman andaja यांनी वर्तवलेला असून, तो अधिकृत भारतीय हवामान विभागाच्या अंदाजापेक्षा वेगळा असू शकतो. अद्यावत आणि अधिकृत इशारा साठी IMD चे संकेतस्थळ जरूर तपासा.)
