IMD चा राज्याच्या वातावरणाबाबत मोठा इशारा नवीन अंदाज पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IMD Weather Update : सध्या राज्यामध्ये विविध ठिकाणी पावसाने धुमाकूळ घातलेला आहे अशातच पुन्हा एकदा हवामान खात्याचा अंदाज आल्याने सर्वांच्याच लक्ष या हवामान अंदाज कडे लागले आहे. हवामान खात्याच्या ताज्या अपडेट नुसार, अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात कोणतेही मोठे हवामान प्रणाली सक्रिय नसल्याने राज्यात पावसाचे काही तांत्रिक विश्रांती घेईल अशी शक्यता आहे. मात्र येथे काही दिवसात हवामानात मोठ्या बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एका बाजूला एल निनो चा वाढता प्रभाव चिंता वाढत असला, तरी त्याचवेळी हिंद महासागरात सक्रिय होत असलेला पॉझिटिव्ह IOD मान्सूनला आधार देऊ शकतो, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. चला तर जाणून घेऊ का? ऑगस्ट महिन्याचा सविस्तर अंदाज.

पुढच्या आठवड्यात पाऊस कसा पडणार?

बुधवारी रायगड आणि पुणे जिल्ह्यांतील घाटमाथा भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत सध्या अधून-मधून पावसाचा खेळ सुरू असून, हा तुरळक पाऊस १२ ऑगस्टपर्यंत असाच सुरू राहील, अशी माहिती हवामान अभ्यासक राजेश कपाडिया (वेदर वेगरिज ऑफ इंडिया) यांनी दिली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही याच काळात अधून-मधून पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवली, मात्र १२ ऑगस्टनंतर हवामानात लक्षणीय बदल होण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी यावेळी अशी माहिती दिली आहे. IMD Weather Update

20 ऑगस्ट नंतर राज्यातील परिस्थिती बदलणार?

हवामान अभ्यासक यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बदलामागचं शास्त्रीय कारण स्पष्ट केलं आहे. हिंद महासागरात सध्या पॉझिटिव्ह आयओडी (Indian Ocean Dipol) तयार होत असून, अपेक्षेप्रमाणेच ही प्रक्रिया पुढे सरकते आहे. मात्र या आयओडीचा वातावरणावरील प्रभाव पूर्ण क्षमतेने दिसून येण्यासाठी २० ऑगस्टपर्यंत वाट पाहावी लागेल, असं त्यांनी सांगितलं. पॉझिटिव्ह आयओडी ही स्थिती भारतात चांगल्या पावसासाठी अनुकूल मानली जाते.

मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात या पॉझिटिव्ह आयओडीमुळे एल निनोचा प्रतिकूल प्रभाव कमी होऊ शकतो का, या प्रश्नावर शेट्टी यांनी सावध आशावाद व्यक्त केला ते म्हणाले की हे शक्य आहे, मात्र त्यासाठी वातावरणातील इतर चक्रीय घटकांची आणि बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यांचीही तितकीच साथ मिळणं आवश्यक आहे.

हे पण वाचा : तुम्हाला माहित आहे का? हवामान खातं पावसाचा अंदाज नेमका कसा वर्तवतं?

आयओडी म्हणजे नेमकं काय? (Indian Ocean Dipole)

आयओडी ही जागतिक हवामान चक्राचा एक महत्त्वाचा भाग आहे, जी प्रशांत महासागरातील एल निनो-सदर्न ऑसिलेशनसारख्या इतर हवामान घटनांशी परस्पर आंतरक्रिया करते. ही संकल्पना सर्वप्रथम सन १९९९ मध्ये भारतीय विज्ञान संस्थेतील (IISc) भारतीय हवामान संशोधकांनी शोधून काढली होती.

आता ऑगस्टचं गणित कुणाच्या हाती?

आता ऑगस्ट महिन्यातील पाऊस नेमका कसा राहील, हे मुख्यत्वे एल निनो आणि पॉझिटिव्ह आयओडी यांच्यातील ‘रस्सीखेच’ ठरवणार आहे. एल निनोचा प्रभाव पावसाला मारक ठरतो, तर पॉझिटिव्ह आयओडी पावसासाठी पूरक मानला जातो आणि यातला कोणता घटक अधिक प्रबळ ठरतो, यावरच पुढील काही आठवड्यांतील पावसाचं भवितव्य अवलंबून राहील.

(टीप: वरील माहिती हवामान अभ्यासक राजेश कपाडिया आणि अथ्रेय शेट्टी यांनी दिलेल्या विश्लेषणावर आधारित आहे. अद्ययावत व अधिकृत इशाऱ्यांसाठी भारतीय हवामान विभागाच्या (IMD) संकेतस्थळाला भेट द्यावी.)

Leave a Comment

error: Content is protected !!