तुमचा Pm किसान योजनेचा हप्ता बंद झालाय का? या पद्धतीने पुन्हा सुरू करा PM किसान योजनेचा हप्ता

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm kisan Scheme Installment : देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकारने फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी यशस्वी ठरत आहे. देशभरातील जमीनदारक शेतकऱ्यांसाठी हा मोठा एक आर्थिक आदर बनलेला आहे. जे शेतकरी या योजनेमध्ये पात्र आहे त्यांच्या खात्यामध्ये DBT अंतर्गत शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये दरवर्षी सहा हजार रुपये तीन समान हफ्त्यांमध्ये जमा केली जातात. मात्र काही शेतकऱ्यांना हा हप्ता अचानक येणे बंद झाल्याच्या तक्रारी सध्या समोर आलेले आहेत. असं का घडतय यावर नेमका उपाय काय, हे एकदा समजून घेऊया. Pm kisan Scheme Installment

हप्ता बंद होण्यामागचे कारणे

शेतकऱ्यांचा हप्ता अचानक बंद होण्याचे काही संभाव्य कारणे आहेत त्यामधली एक म्हणजे जमीनप्रमाणेकरण (land Seeding) झालेलं नसणं, तसेच e-KYC पूर्ण केलेली नसणे, बँक खाता आधार क्रमांक अशी लिंक नसणे, बँक खातं DBT इनेबल असणे, आधार लिंक असलेल्या बँक खाते बंद असणे, एकाच बँक खात्यातला दुसऱ्या व्यक्तीचा आधार क्रमांक चुकून लिंक असणे, नोंदणी नंतर आधार क्रमांका मध्ये दुरुस्ती केलेली असणे, नोंदणी नंतरच्या काळात आयकर भरणा सुरू केलेला असणे, लाभार्थ्याने स्वतःहून योजनेचा लाभ सोडून दिलेला असणं, विविध तांत्रिक कारणामुळे अर्ज निष्क्रिय झालेला असणे, लाभार्थ्यांचा निधन झाल्याने तो अपात्र ठरणे, नोंदणी नंतर जमिनीची विक्री केल्याने संबंधित व्यक्ती भूमिहीन ठरण, बँकेकडून व्यवहार यशस्वी होणं. असे अनेक इत्यादी कारण आहेत.

हप्ता पुन्हा सुरू करण्यासाठी काय करावं?

वरीलपैकी तुमच्या बाबतीत नेमकं कोणतं कारण लागू होतं, हे समजल्यानंतर पुढील उपाय करता येतील:

  • जमीन प्रमाणीकरणासाठी: महसूल विभागाशी थेट संपर्क करून आपल्या जमिनीचं सीडिंग (Land Seeding) करून घ्या.
  • ई-केवायसीसाठी : स्वतः ऑनलाईन, जवळच्या सीएससी केंद्रावर किंवा गावातील कृषी सहायकांमार्फत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या.
  • बँक खातं लिंक नसल्यास : बँकेत जाऊन आधार लिंकिंग करून घ्या, किंवा जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये DBT-सक्षम खातं उघडा.
  • आधारमधील त्रुटींसाठी : बँकेत प्रत्यक्ष जाऊन चौकशी करा आणि आवश्यक त्या दुरुस्त्या करून घ्या; आधार क्रमांकातील दुरुस्ती स्वतः किंवा सीएससी केंद्रामार्फत संबंधित पोर्टलवर करता येते.
  • चुकीने अपात्र ठरवलं गेलं असल्यास : तुम्ही प्रत्यक्षात पात्र असूनही अपात्र घोषित करण्यात आलं असेल, तर सर्व अधिकृत कागदपत्रांसह तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन अपात्रता मागे घेण्यासाठी लेखी अर्ज सादर करा.

जर तुमचा देखील हप्ता बंद झाला आहे असे लक्षात येताच वेळ न घालवता योग्य पाऊल उचला बहुतांशी वेळी ही समस्या लवकर सोडवली जाते. त्यामुळे संबंधित आपल्या बँक खात्याशी तांत्रिक त्रुटी आहे का? जमीन सिडींग आहे का? केवायसी पूर्ण केली आहे का? ती वेळेत दुरुस्त केल्यास हप्ता पुन्हा सुरळीत सुरू होतो.

हे पण वाचा : शेवटी शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपली! शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार pm Kisan योजनेचे ₹2000 रुपये? तुम्हाला मिळणार का चेक करा

3 thoughts on “तुमचा Pm किसान योजनेचा हप्ता बंद झालाय का? या पद्धतीने पुन्हा सुरू करा PM किसान योजनेचा हप्ता”

  1. हमारे पी एम किसान योजने के पैसे हमारे अकाउंट में पहले आते थे अभी बंद हो गया है आपसे विनंती है की हमारे पी एम किसान योजना के पैसे सुरू करणे की विनंती है

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!