Konkan Railway GaneshChaturthi Timetable : राज्यात लवकरच आता सणासुदीचे दिवस सुरू होणार आहेत आणि त्यामध्ये एक म्हणजे गणेशोत्सव या हा गणेशोत्सव महाराष्ट्र मधला मुख्य सण आहे. सर्वजण मोठ्या उत्साहात हा सण साजरा करतात. आपल्या लाडक्या बाप्पाची आगमनाची ओढ सगळ्यांनाच लागलेली असते. गौरी गणेशोत्सव निमित्त कोकणामध्ये मोठ्या थाटामाटा मध्ये हा सण साजरा केला जातो. आणि या सणानिमित्त मुंबईत किंवा इतर शहरात कामा निमित्त आलेल्या नागरिकांना वापस त्यांच्या गावी हा उत्सव साजरी करण्यासाठी जाता यावे. यासाठी शासनाने यावेळेस रेल्वेच्या नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. तर कसा असणार आहे वेळापत्रक एकदा आपण जाणून घेऊया. Konkan Railway GaneshChaturthi Timetable
मुंबईमध्ये राहून पोटापाण्यासाठी झटणाऱ्या प्रत्येक कोकणवासी साठी एकच सण असतो, तो म्हणजे गौरी गणेशोत्सव. यंदाचा गणेशोत्सव हा 14 सप्टेंबर 2026 रोजी घरोघरी साजरा होणार असून कोकणात हा सण अजूनही तितक्याच पारंपारिक पद्धतीने आणि श्रद्धेने साजरा केला जातो. म्हणून दरवर्षी याच काळात मुंबई मधून कोकणाकडे जाणाऱ्या लोकांची संख्या जास्त असते. याच गर्दीचा अंदाज घेऊन पश्चिम रेल्वेने यंदाही नागरिकांसाठी एक दिलासादायक निर्णय घेतलेला आहे.
यंदा किती गाड्या धावणार?
गणेशोत्सवाच्या काळात होणारी अतिरिक्त प्रवासी गर्दी लक्षात घेऊन, पश्चिम रेल्वेने ‘ट्रेन ऑन डिमांड (TOD) एक्स्ट्रा रश’ या योजनेअंतर्गत विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे बोर्डाच्या मंजुरीनंतर सप्टेंबर २०२६ मध्ये एकूण ८ जोड्या, म्हणजे १६ गाड्यांच्या माध्यमातून तब्बल २१ फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. या गाड्या मुंबई, गुजरात, कोकण आणि कर्नाटक या भागांना एकमेकांशी जोडणार आहेत.
बहुतांश गाड्या मुंबई सेंट्रल, वडोदरा, विश्वामित्री, उदना, वलसाड आणि बांद्रा टर्मिनस या स्थानकांवरून सुटणार आहेत. यातील बहुतांश गाड्या विशेष भाड्याने धावतील, तर बांद्रा टर्मिनस ते रत्नागिरी ही गाडी मात्र अनारक्षित (Unreserved) स्वरूपात चालवली जाणार आहे म्हणजे शेवटच्या क्षणी प्रवासाचा बेत ठरलेल्या प्रवाशांसाठीही एक सोयीचा पर्याय उपलब्ध असेल.
कोणत्या मार्गावर किती फेऱ्या?
घोषित करण्यात आलेल्या गाड्यांचं वेळापत्रक असं आहे:
मुंबई सेंट्रल : ठोकूर (साप्ताहिक) १ फेरी
मुंबई सेंट्रल : सावंतवाडी रोड (आठवड्यातून ४ दिवस) ८ फेऱ्या
बांद्रा टर्मिनस: रत्नागिरी (साप्ताहिक, अनारक्षित) २ फेऱ्या
वडोदरा: रत्नागिरी (साप्ताहिक) १ फेरी
विश्वामित्री : रत्नागिरी (द्विसाप्ताहिक) ४ फेऱ्या
विश्वामित्री : रत्नागिरी (साप्ताहिक) २ फेऱ्या
उदना: रत्नागिरी (साप्ताहिक) २ फेऱ्या यातून हे स्पष्ट दिसतं की सावंतवाडी आणि रत्नागिरी या दोन मार्गांवर यंदा सर्वाधिक फेऱ्यांचं नियोजन करण्यात आलं आहे जो कोकणातील सर्वाधिक गर्दीचा पट्टा मानला जातो.
या ठिकाणी तिकीट बुक करू शकता
जर तुम्हाला देखील तुमच्या गावी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जायचं असेल आणि या गाड्यांची सविस्तर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही रेल्वेच्या NTES आणि ICMS अधिकृत वेबसाईट वरती उपलब्ध करून दिली जाणार आहे. आरक्षणाची सुविधा IRCTC च्या वेबसाईट/ ॲपवर तसंच नजीकच्या आरक्षण केंद्रावर मिळेल. याशिवाय स्टेशनवर या गाडीच माहिती फलकाद्वारे, आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
ज्या वेळेचा गणेश उत्सव हा महाराष्ट्रासाठी खरोखरच महत्त्वाचा ठरणार आहे. कारण आपल्या लाडक्या बाप्पाची आगमनाची ओढ सर्व महाराष्ट्रालाच लागलेले असते. फक्त कोकणामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र मध्ये गणेश उत्सव साजरा केला जातो आणि मोठा थाटामाटा मध्ये हा उत्सव साजरा केला जातो. या वेळचा देखील गणेशोत्सव थाटामाटा मध्ये साजरा केला जाणार आहे आणि दरवेळेस प्रमाणे याही वेळेस बाप्पाकडे एकच मागणं असेल “इडा पिडा टळू दे आणि बळीच राज्य येऊ दे!” अशाच कृषीच्या बातम्यांसाठी आणि हवामान अंदाज विषय अपडेट साठी तसेच ताज्या घडामोडी साठी आम्हाला फॉलो करत चला.
