IMD Maharashtra Weather Update : भारतीय हवामान खात्याने नुकत्याच दिलेल्याताज्या अपडेटनुसार, राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाची दुसरी इनिंग सुरू होणार आहे. कोकण आणि मध्ये महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरती गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळाली. आजही जोर कायम राहण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमी वरती हवामान विभागाने पुन्हा एकदा राज्यातील 11 जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र या ठिकाणी घाटमाथ्यावरती आणि पूर्व विदर्भातील काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असल्याने शेतकरी आणि नागरिकांना सुरक्षेच आव्हान करण्यात आल आहे. IMD Maharashtra Weather Update
हवामान खात्याचा कुठे कुठे इशारा?
हवामान खात्याच्या ताज्याअपडेट नुसार, कोकणात आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, ठाणे मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरती काही भागात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भातील गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये देखील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्याच्या उर्वरित भागांमध्ये मात्र पावसाचा जोर तुलनेने फारच कमी आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडू शकतो. त्यामुळे विशेष घाटमाथा आणि पावसाचा जोर असल्याने या भागातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचा आवाहन करण्यात आला आहे.
राज्यातील एका बाजूला पावसाचा जोर वाढत असताना विदर्भात मात्र चित्र नेमक उलट पाहायला मिळत आहे. गेलं काही दिवसांपासून या भागात पावसाने पूर्णपणे दांडी मारलेली असल्याने नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मोठी चिंता पडलेली आहे. सध्या खरीप हंगामातील पिकांची वाढ सुरू झाली असून हा महत्त्वाचा टप्पा पाण्याविना व्हायला जाण्याची शक्यता असल्याची सध्या शक्यता व्यक्त केली जात आहे.
जुलै महिन्याच्या खरेच झालेल्या दमदार पावसामुळे पावसाची तूट काही प्रमाणात भरून निघाली होती. परंतु ऑगस्ट महिन्यात पुन्हा एकदा पावसाने पाठ फिरवल्याने परिस्थिती आणखी चिंताजनक बनली आहे.
सध्या वरील माहिती पाहता विदर्भातील बहुतांश भागांमध्ये खरीप पिकासाठी योग्य पावसाची गरज आहे. ज्या भागात तूट अधिक आहे तिथल्या शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचे काटे कोर नियोजन करावे आणि हवामान विभागाच्या पुढील अंदाज यावर बारीक लक्ष ठेवा व जेणेकरून पाऊस परतल्यास त्याचे जास्तीत जास्त फायदा पिकांना करून देता येईल.
हे पण वाचा : राज्यात भयंकर वारे वाहणार, मुसळधार पावसासोबत राज्यावरती मोठे संकट! वाचा सविस्तर माहिती
