Pm Kisan Yojana : लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती Pm किसान योजनेचे पैसे जमा होणार? 24 व्या हप्त्याची मोठी अपडेट!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm Kisan Yojana : शेतकरी म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर लगेच चित्र उभा राहते ते म्हणजे शेतात राबणारा शेतात कष्ट करणारा आणि पीक पिकवणारा तो म्हणजे शेतकरी. खरंतर भारताचे अर्थकारण ही सर्व शेतीवरच अवलंबून आहे. परंतु याच काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना, शेती करत असताना नैसर्गिक आपत्तींना देखील तोंड द्यावे लागते. कधी मुसळधार पाऊस पडतो तरी कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, तर कधी नैसर्गिक आपत्ती. परंतु याच शेतकऱ्यांना शेती करताना आर्थिक पाठबळ मिळावे, शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने पीएम किसान योजना राबवली. ही योजना शेतकऱ्यांसाठी खरोखरच एक वरदान ठरत आहे. आणि याच योजनेचा 24 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी येणार याची आतुरता आता शेतकऱ्यांना लागलेली आहे. आतापर्यंत वेळेवरती शेतकऱ्यांच्या खात्यावरती 23 हप्ते नियमित प्रमाणे जमा झालेले आहेत. या योजनेच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ देण्यासाठी शासन दरवर्षी सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करते (प्रत्येकी दोन हजार रुपयाचे चार महिन्यांच्या अंतरावरती). Pm Kisan Yojana

24 हप्ता खात्यावरती कधी येणार? When will the 24th of PM Kisan Yojana come?

या योजनेचा मागचा हप्ता हा जून महिन्याच्या आधीच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला होता. आता याच योजनेच्या नियमानुसार दर चार महिन्यांनी नियमितपणे हा हप्ता जमा झाला पाहिजे. तर आता पुढचा विचार आपण केला तर 24 वा हप्ता ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा शेवटच्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. सरकारने याबाबत कुठलीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. त्यामुळे सप्टेंबर किंवा ऑक्टोबर हा महिना शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावा. सोशल मीडिया वरती शेतकऱ्यांना दिशाभूल करणारी अनेक माहिती पसरवली जाते. परंतु शेतकऱ्यांनी अशा कुठल्याही दिशाभूल करणाऱ्या माहितीवर विश्वास न ठेवता अधिकृत घोषणेची वाट पहावी.

हप्ता खात्यात येण्याआधी हे काम करा

प्रकार लवकरच हप्त्याची तारीख जाहीर करेल परंतु शेतकऱ्यांना हप्ता मिळवण्यासाठी काही काम पूर्ण करणे गरजेचे आहे. ते म्हणजे e-KYC पूर्ण करून ठेवणे नसेल तर सरकार तुमच्या आर्थिक मदत रोखू शकते. हा प्रक्रिया करणं फारसं किचकट नाही तुम्ही घरबसल्या मोबाईल वरती मिळणाऱ्या ओटीपीच्या मदतीने किंवा जवळच्या CSC केंद्रावर जाऊन सहजपणे ही प्रक्रिया पूर्ण करू शकता.

बँक खात्याबाबतही या गोष्टी तपासा

केवळ ई-केवायसी पुरेसं नाही हप्ता विनाअडथळा मिळण्यासाठी तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक असणं आणि त्यावर DBT (थेट लाभ हस्तांतरण) सुविधा सक्रिय असणं आवश्यक आहे. तुमच्या नावात काही चूक असेल किंवा इतर कोणतीही तांत्रिक त्रुटी असेल, तरीही तुमचे पैसे अडकू शकतात. त्यामुळे कोणतीही अडचण आधीच टाळण्यासाठी, वेळ न घालवता एकदा तुमच्या बँक शाखेत जाऊन खात्याची स्थिती तपासून घ्या.

(टीप: वरील माहिती उपलब्ध वृत्तांवर आधारित आहे. हप्त्याच्या नेमक्या तारखेबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही; अद्ययावत माहितीसाठी PM-KISAN च्या अधिकृत संकेतस्थळाला (pmkisan.gov.in) भेट द्यावी.)

Leave a Comment

error: Content is protected !!