LPG Cylinder Rules : आता स्वयंपाक घरामध्ये चुलीची जागा गॅस सिलेंडरने घेतलेली आहे. आता प्रत्येकाच्या घरामध्ये गॅस सिलेंडर आवश्यक आहे आणि ही एक गरज लागणारी वस्तू बनलेली आहे. आता घरामध्ये कुठलाही स्वयंपाक करायचा म्हटले की, गॅस लागतो. जर घरात अचानक गॅस सिलेंडर संपला आणि त्याच वेळी जेवणाची तयारी अर्धवट राहिली तर अनेकांच्या घरांमध्ये एक शिल्लक गॅस असतो आणि अनेक जण दुसरा गॅस ठेवतात परंतु जर तुम्ही देखील दुसरा गॅस साठवून ठेवत असाल हे शहाणपण कधी कधी महागात पडू शकते कारण गॅस सिलेंडर बाबत महत्त्वाचा नियम आहे जो अनेक नागरिकांना माहीतच नाही. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती LPG Cylinder Rules
डबल गॅस ठेवत असाल तर हा नियम वाचा
तुम्ही देखील तुमच्या घरामध्ये डबल गॅस ठेवत असेल तर हा नियम नक्की वाचा. मध्य पूर्वेतील अलीकडच्या काळामध्ये तणाव परिस्थिती निर्माण झाल्यामुळे एलपीजी आणि डबल सिलेंडर कनेक्शन वर निर्बंध घालण्यात आले होते. मात्र आता काही महिने उलटल्यानंतर या निर्बंधांमध्ये शितलता आणण्यात आली आहे, आणि दुहेरी सिलेंडर जोडण्यासाठी अर्ज करणाऱ्या ग्राहकांना पुन्हा मंजुरी दिली जात आहे. ज्यांना दुसरा सिलेंडर जोडणी हवी आहे ते आता थेट आपल्या गॅस एजन्सीची संपर्क साधू शकता.
घरात किती सिलेंडर असले पाहिजे?
जर तुम्हाला देखील घरामध्ये गॅस ठेवायचे असेल तर गॅस सिलेंडरच्या नियमानुसार दोन गॅस सिलेंडर ठेवणे हे मान्य आहे. एक सिलेंडर रोजच्या स्वयंपाकासाठी वापरात असतो, एक दुसरा गरजेच्या वेळी राखीव म्हणून वापरता येतो. यामुळे एक सिलेंडर अचानक संपला तरी लगेच दुसरा वापरता येतो त्यामुळे गैरसोय टाळता येते.
मात्र याच ठिकाणी एक महत्त्वाची महत्त्वाचा नियम माहित असणे गरजेचे आहे. घरात गरजेपेक्षा जास्त गॅस सिलेंडर साठवून ठेवता येत नाही, हे नियमापलीकडचे आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, दोन पेक्षा जास्त भरलेले सिलेंडर घरात ठेवण्यासाठी संबंधित नियमांतर्गत विशेष परवानगी घ्यावी लागते. अशी परवानगी न घेता जास्तीचे सिलेंडर साठवणं हा अवैध साठा मानला जातो, जो कायद्याने गुन्हा आहे. यामुळे थेट कनेक्शन रद्द होण्यापासून दंड किंवा तुरुंगवासापर्यंतची कारवाई होऊ शकते. त्यामुळे एखाद्या कुटुंबाला खरोखरच अतिरिक्त सिलेंडरची गरज वाटत असेल, तर आधी आपल्या संबंधित एजन्सीशी नियम वाचून घेऊन पुढचा निर्णय घ्यावा.
जास्त सिलिंडर म्हणजे जास्त धोका
हा नियम केवळ कागदोपत्री कठोरपणासाठी नाही यामागे सुरक्षिततेचं ठोस कारण आहे. LPG हा अत्यंत ज्वलनशील वायू आहे. एखाद्या सिलिंडरमधून चुकून गॅस गळती झाली आणि आजूबाजूला आग किंवा ठिणगी असेल, तर मोठी दुर्घटना घडू शकते. घरात गरजेपेक्षा जास्त सिलिंडर असतील, तर हा धोका आणखी वाढतो. म्हणूनच सिलिंडरची संख्या आणि त्यांची सुरक्षित साठवणूक याबाबत ठोस नियम तयार करण्यात आले आहेत. विशेषतः लहान घरं किंवा हवा खेळती न राहणाऱ्या (कमी व्हेंटिलेशन असलेल्या) जागांमध्ये सिलिंडर ठेवताना अधिक सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे.
हे पण वाचा : गॅस सिलेंडर धारकांसाठी महत्त्वाच्या सूचना! 15 ऑगस्टपर्यंत हे काम पूर्ण करा नाहीतर बंद होऊ शकते तुमचे गॅस सिलिंडर
