वातावरणात झाला मोठा बदल; राज्यावरती दुहेरी संकट? नवीन हवामान अंदाज पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Weather Update Today : राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात वेगळाच बदल पाहायला मिळत आहे. जुलै महिन्यामध्ये पावसाने चांगली हजेरी लावली परंतु आता ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रात कुठेही अपेक्षित पाऊस पडत नाही फक्त हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. अनेक भागात याच पावसाची मोठ्या प्रमाणामध्ये तूट वाढत चालली असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. चांगला पाऊस आणि जोरदार पाऊस कधी होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर हवामान अंदाज. Maharashtra Weather Update Today

हवामान खात्याच्या नवीन अपडेट नुसार, कोकण विभागात सुद्धा पावसाची तूट पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्पष्टपणे पावसाची तूट निर्माण झाली आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी सध्या कोणताही विशेष पावसाचा अलर्ट देण्यात आलेला नाही. पुढील काही दिवस या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तर तसेच धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असली तरी या भागात काही दिवसापासून चांगलीच पावसाने उघडदीप घेतली आहे. त्यामुळे इथे चांगल्या पावसासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार असल्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हवामान कोरड आणि दमट राहण्याची शक्यता आहे.

तसेच मराठवाड्यात देखील चिंता वाढत चालली असून छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या ठिकाणी अजून चांगला पाऊस झालेलाच नाही. यामुळे या ठिकाणचे शेतकऱ्यांना पावसाची अत्यंत गरज आहे. तर या ठिकाणी पुढील काही दिवस हवामान कोरड आणि उष्ण राहण्याची शक्यता असल्याने या भागात शेतकऱ्यांना नागरिकांना आणखी चिंता वाढलेली आहे तरी याच परिस्थिती वरती या भागात शेतकऱ्यांनी आपल्या शेतपिकांची विशेष काळजी घ्यावी.

विदर्भात देखील परिस्थिती थोडीशी वेगळी पाहायला मिळत आहे. अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा या जिल्ह्यासाठी कोणताही पावसाचा इशारा नसला तरी इथे उष्णता वाढण्याची शक्यता आहे. मात्र गोंदिया जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आलेला असून गडचिरोलीसाठी उद्या येलो आर्ट देण्यात आला आहे. येथे काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील इतर भागांमध्ये मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज आहे.

सध्या राज्यात वातावरण पाहता गोंदिया आणि काही प्रमात गडचिरोली वगळता बहुतांश भागासाठी सध्या कोणताही विशेष अलर्ट देण्यात आलेला नाही. अनेक भागात पावसाने अशीच सतत तूट निर्माण झाल्याने ऑगस्ट महिना अपेक्षित पाऊस न झाल्याचे स्पष्ट चित्र समोर येत आहे. यामुळे राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना पावसाची आतुरतेने वाट पाहावी लागत आहे. पुन्हा पाऊस कधी हजेरी लावणार अशी आस सध्या आभाळाकडे लावून बसले आहेत. आता राज्यात पाऊस पुन्हा कधी आगमन करतो या कडे पाहण्यासारखे राहणार आहे.

हे पण वाचा : पावसाने उघडीप दिली, पण पंजाबराव डखांचा मोठा अंदाज  या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात धुवांधार पाऊस!

Leave a Comment

error: Content is protected !!