ATM New Rule : 1 मे 2025 पासून ATM वापरासंबंधी नवे नियम लागू होणार असून ग्राहकांच्या खिशावर याचा थेट परिणाम होणार आहे. एचडीएफसी बँक (HDFC Bank), पंजाब नॅशनल बँक (PNB), इंडसइंड बँक (IndusInd Bank) यांसारख्या अनेक बँकांनी ATM व्यवहारांवरील शुल्कामध्ये वाढ जाहीर केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) याआधीच ATM इंटरचेंज फी वाढवण्यास मान्यता दिली होती आणि त्यानुसार NPCI च्या शिफारशींवर आधारित हे बदल आता प्रत्यक्षात लागू होणार आहेत. ATM New Rule
मोफत व्यवहारांची मर्यादा काय आहे?
नवीन नियमानुसार, ग्राहकांना त्यांच्या स्वतःच्या बँकेच्या एटीएमवर मर्यादित मोफत व्यवहारांची सुविधा मिळणार आहे.
मेट्रो शहरांमध्ये : दरमहा 3 मोफत व्यवहार
नॉन-मेट्रो शहरांमध्ये : दरमहा 5 मोफत व्यवहार
या मर्यादांमध्ये रोख रक्कम काढणे, बॅलन्स तपासणी, मिनी स्टेटमेंट पाहणे इत्यादी व्यवहारांचा समावेश आहे.
मर्यादेनंतर किती शुल्क आकारले जाणार?
मोफत व्यवहारांची मर्यादा ओलांडल्यास आता ग्राहकांना वाढीव शुल्क भरावे लागणार आहे.
प्रत्येक अतिरिक्त आर्थिक व्यवहारासाठी : ₹23 + GST
प्रत्येक गैर-आर्थिक व्यवहारासाठी (PNB मध्ये) : ₹11 + GST
हे शुल्क ग्राहक बँकेच्या एटीएमसोबतच इतर बँकांच्या एटीएमवरही लागू होईल. विशेष म्हणजे, रोख रक्कम काढणे वगळता कॅश रिसायकल मशीनवरील व्यवहारांवर देखील हे शुल्क लागू असेल.
एचडीएफसी बँकेचे (HDFC Bank) नवे ATM शुल्क
एचडीएफसी बँकेने स्पष्ट केलं आहे की 1 मे 2025 पासून मोफत मर्यादा ओलांडल्यानंतर ग्राहकांना प्रत्येक व्यवहारावर ₹23 + कर भरावा लागेल.
मात्र, HDFC च्या ATM वर केवळ रोख रक्कम काढण्यावरच शुल्क लागेल.
बॅलन्स तपासणी, पिन बदल, मिनी स्टेटमेंट हे बिगर-आर्थिक व्यवहार HDFC ATM वर मोफतच राहतील.
इतर बँकांच्या एटीएमवर मात्र आर्थिक व बिगर-आर्थिक दोन्ही व्यवहारांना शुल्क लागणार.
पंजाब नॅशनल बँकेचे (PNB) नवे ATM शुल्क
आर्थिक व्यवहारांवर : ₹23 + GST
गैर-आर्थिक व्यवहारांवर : ₹11 + GST
इतर बँकांच्या एटीएमचा वापर केल्यानंतर ही शुल्करचना लागू होईल.
इंडसइंड बँकेचे (IndusInd Bank) नवे नियम
1 मेपासून, नॉन-इंडसइंड एटीएम वापरावर मोफत मर्यादा पार केल्यास सर्व प्रकारच्या खातेदारांना प्रत्येक व्यवहारासाठी ₹23 शुल्क भरावे लागेल.
ग्राहकांनी काय काळजी घ्यावी?
आपल्या बँकेच्या एटीएमचा जास्तीत जास्त वापर करावा.
फक्त गरज असेल तेव्हाच इतर बँकांचे एटीएम वापरावेत.
डिजिटल व्यवहारांकडे वळल्यास व्यवहार खर्च वाचवता येऊ शकतो.
1 मे 2025 पासून ATM व्यवहारांसाठी लागणारे शुल्क वाढणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या व्यवहारांची आखणी जाणीवपूर्वक करणे आवश्यक आहे, अन्यथा प्रत्येक अतिरिक्त व्यवहारात खिशाला चाट बसू शकते.
हे पण वाचा | Kanda Market Price: कांद्याच्या बाजार भावात झाला मोठा बदल, पहा नवीन आजचा बाजार भाव
2 thoughts on “1 मेपासून ATM वापर महागणार : HDFC, PNB, इतर बँकांनी शुल्कात केली वाढ; जाणून घ्या नवीन नियम”