खाद्यतेलाच्या किमतीत दिलासा! केंद्र सरकारने कस्टम ड्युटी केली कमी, आता स्वयंपाकघराचं बजेट थोडं सावरणार


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cooking Oil Price Drop :- गेल्या काही महिन्यांपासून तेलाचे दर अक्षरश आकाशाला भिडले. Cooking Oil Price Hike मुळे सर्वसामान्यांचा रोजचा स्वयंपाक करणे म्हणजे मोठं संकटच झालं. एक लिटर तेल खरेदी करतानाही दोनदा विचार करावा लागत होता. विशेषतः ग्रामीण भागात जिथं उत्पन्न मर्यादित असतं, तिथं तर ही महागाई असह्य झाली होती.

हे पण वाचा | एकाच दिवशी ३००० रुपये खात्यात जमा होणार? ‘लाडकी बहीण’ योजनेतून महिलांना मिळणार मोठा दिलासा

पण आता केंद्र सरकारने घेतलेला एक महत्त्वाचा निर्णय जनतेसाठी मोठा दिलासा घेऊन आलाय. सरकारने खाद्यतेलाच्या किमती कमी करण्यासाठी Custom Duty मध्ये कपात केली आहे.

पूर्वी कच्च्या पाम तेल, कच्च्या सोयाबीन तेल आणि कच्च्या सूर्यफूल तेलावर 20% Basic Custom Duty लावली जात होती. आता ती थेट 10% केली गेली आहे. म्हणजेच सरकारने अर्धा कर कमी केलाय!

हे पण वाचा | एकाच दिवशी ३००० रुपये खात्यात जमा होणार? ‘लाडकी बहीण’ योजनेतून महिलांना मिळणार मोठा दिलासा

हा निर्णय 31 मेपासून लागू झाला असून, त्याचा परिणाम जून महिन्याच्या सुरुवातीलाच बाजारात दिसून येईल अशी शक्यता आहे.

सरकारचा निर्णय काय आहे?

Crude Palm Oil, Crude Soybean Oil आणि Crude Sunflower Oil यावर लागणारा मूळ Basic Custom Duty 20% वरून 10% करण्यात आला आहे. याआधी या तिन्ही तेलांवर एकूण Import Duty म्हणजेच इंपोर्ट शुल्क 27.5% इतकं होतं. आता ते 16.5% एवढं राहणार आहे.

भारताचं तेल आयातीवर अवलंबित्व

  • भारत आपल्याला लागणारं सुमारे 70 टक्क्यांपेक्षा जास्त खाद्यतेल आयात करतो.
  • Palm Oil – इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड इथून
  • Soybean आणि Sunflower Oil – अर्जेंटिना, ब्राझील, रशिया, युक्रेन इथून

हे पण वाचा | Ladki Bahin Yojana Update : अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त गेला… पण हप्ता गायबच! लाडक्या बहिणींच्या डोळ्यात अजूनही वाट बघणं!

या सगळ्या देशांतून होणाऱ्या तेलाच्या आयातीवर जेव्हा जास्त Custom Duty लागते, तेव्हा तो भार थेट ग्राहकाच्या खिशावर येतो. म्हणूनच सरकारने हा कर कमी करून थेट ग्राहकाच्या खिशाला दिलासा दिला आहे.

महागाईचं पाणी डोक्यावर गेलं होतं

  • गेल्या वर्षभरात तेलाचे दर इतके वाढले होते की, सर्वसामान्यांना दररोजच्या जेवणासाठी खर्च वाढवावा लागला.
  • एका गरीब मजुराच्या घरात जेवणात एक चमचा तेल वापरायचंही मोजून मापून व्हायचं.
  • महागाईने गरिबाचं जगणं कठीण केलं होतं.
  •  सप्टेंबर 2024 मध्ये सरकारने एकदम 20% Import Duty लावली होती.
  • पूर्वी ही Duty फक्त 5.5% होती! त्यामुळे लगेचच तेलाचे दर वाढले आणि बाजारात गडबड उडाली.
  • अशाच अनेक नवनवीन माहितीसाठी येथे क्लिक करून  व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “खाद्यतेलाच्या किमतीत दिलासा! केंद्र सरकारने कस्टम ड्युटी केली कमी, आता स्वयंपाकघराचं बजेट थोडं सावरणार”

Leave a Comment