एकाच दिवशी ३००० रुपये खात्यात जमा होणार? ‘लाडकी बहीण’ योजनेतून महिलांना मिळणार मोठा दिलासा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana Scheme: लाडक्या बहिणींसाठी आता मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंतर्गत येत्या काही दिवसांत महिलांच्या खात्यात तब्बल ३,००० रुपये एकाच दिवशी जमा होणार आहेत, अशी माहिती समोर येत आहे. मे आणि जून महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे देण्याचा विचार सरकारकडून सुरू असून, यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलणार आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत मात्र मे महिना संपत आला आहे तरी मे महिन्याचे पैसे महिलांना मिळाले नाही त्यामुळे महिलांना मी आणि जून दोन महिन्याचे पैसे एकत्रित मिळणार अशा बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये पसरत आहेत.

काही बाजारात उन्हाळी कांद्याला जोर; पण इतर बाजारातील स्थिती काय? जाणून घ्या..

कधी मिळणार पैसा?

दोन व तीन मे २०२५ रोजी बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाला होता – म्हणजे १५०० रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा झाले. आता मे महिन्याच्या हप्त्याची वाट बघत असलेल्या हजारो महिलांसाठी अजूनही अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. मात्र राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी यासंदर्भातील फायलीवर स्वाक्षरी केल्याचं स्पष्ट केलं आहे. म्हणजेच मे महिन्याचा हप्ता हा या महिन्याच्या अखेरीस मिळू शकतो, किंवा जर काही कारणामुळे उशीर झाला तर जून महिन्यात दोन्ही महिन्यांचे मिळून एकदम ३००० रुपये जमा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हे पण वाचा | सरकारचा मोठा निर्णय! जून महिन्यात मिळणार 3 महिन्यांचे रेशन..

‘लाडकी बहीण योजना’ म्हणजे काय?

ही योजना म्हणजे महिलांसाठी सरकारचा एक आधारस्तंभच आहे. मध्य प्रदेशच्या योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ही योजना २०२४ साली सुरू करण्यात आली. २१ ते ६५ वयोगटातील महिलांना या योजनेत दरमहा १५०० रुपये दिले जातात. हे पैसे कोणालाही भीक न देता, त्यांच्या बँक खात्यात थेट जमा होतात.

ही योजना फक्त गरजू आणि गरीब महिलांसाठीच आहे. विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या, निराधार अशा अनेक स्त्रियांचा यात समावेश आहे. घरात चार चाकी (ट्रॅक्टर वगळता) असल्यास किंवा घरात सरकारी नोकरी करणारा कुणी असल्यास या योजनेचा लाभ मिळत नाही. ज्या महिलांना इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळतो आहे, त्यांनाही या योजनेपासून वगळण्यात आलं आहे.

हे पण वाचा | आज सोनं खरेदीचं उत्तम संधी! सोन्याच्या दरात मोठी हालचाल, पाहा तुमच्या शहरातील भाव

खरंच फायद्याची का ही योजना?

खेड्यापाड्यातील बाईसाठी १५०० रुपये म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. कोणाच्या घरात किराणा येतो, कोणाचं गॅस भरतं, कोणाची मुलगी शिकते आणि कोणाचं तब्येतीसाठी औषधं घेतली जातात हे सगळं या १५०० रुपयांनी होतं. आणि जर दोन महिन्यांचे ३००० रुपये एकदम मिळाले, तर बाईला थोडा हात मोकळा वाटतो. Ladki Bahin Yojana Scheme

हे पण वाचा | दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅबलेट; अर्ज कसा करायचा व शेवटची तारीख किती? पहा सविस्तर..

सरकारने वेळेवर पैसा दिला, तर विश्वास निर्माण होतो

या योजनेचा उद्देश खूप चांगला आहे, पण पैसा वेळेवर मिळाला पाहिजे, ही सर्वसामान्य महिलांची मागणी आहे. अनेक वेळा योजनेचे हप्ते उशिरा मिळतात, त्यामुळे घरखर्च अडतो. पण यावेळी जर खरंच जूनच्या पहिल्या आठवड्यात ३००० रुपये एकत्र आले, तर बहिणींच्या चेहऱ्यावरचा तो समाधानाचा हसू किती सुखद असेल, याची कल्पनाच करता येते.

आज आपल्या राज्यात असंख्य अशा ‘लाडक्या बहिणी’ आहेत ज्या स्वतःच्या कष्टावर आणि जिद्दीवर संसार टिकवतात. त्यांच्या आयुष्यात जर सरकार अशा छोट्या तरीही थेट मदतीच्या माध्यमातून थोडंसं आधार देत असेल, तर ते नक्कीच स्वागतार्ह आहे. पैसा मोठा नाही, पण तो वेळेवर मिळाला तर तो आधार बनतो, आणि त्याच आधारावर बाईचा आत्मसन्मान जगतो.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment