DA Hike July 2025 | महागाईने सामान्य माणसाचं जगणं कष्टाचं केलंय. बाजारात भाजीपाला असो की दवाखान्याचं बिल, प्रत्येक गोष्टीच्या किमती आकाशाला भिडत चालल्या आहेत. अशा काळात केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. लवकरच त्यांच्या पगारात वाढ होणार असून, महागाई भत्त्यात (Dearness Allowance – DA) ३ ते ४ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा | जूनमध्ये या ७ राशींचा सोन्यासारखा काळ सुरू होणार..! पहा तुमची रास आहे का यामध्ये?
सध्या केंद्र सरकारचे कर्मचारी ५५% महागाई भत्ता घेत आहेत. मात्र जुलै २०२५ पासून हा भत्ता ५८% किंवा ५९% पर्यंत जाऊ शकतो. याचा थेट फायदा लाखो कर्मचाऱ्यांना आणि निवृत्त व्यक्तींनाही मिळणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मे २०२५ मध्ये महागाई निर्देशांक (AICPI-IW) १४४ इतका नोंदवण्यात आला आहे. याच निर्देशांकाच्या आधारे सरकार महागाई भत्त्यात वाढ करतं. मार्चमध्ये हा आकडा १४३ होता. तीन महिन्यांत सलग वाढ झाल्याने DA वाढीची शक्यता आणखी बळावली आहे.
या आकड्यांवरून पाहता, महागाई भत्ता ३ टक्क्यांनी वाढला तर तो ५८% होईल, आणि जर सरकारने ४ टक्के वाढ केली, तर भत्ता थेट ५९% वर जाईल. म्हणजेच कर्मचाऱ्यांना दरमहा पगारात हजारोंचा फायदा मिळेल.
याबाबत अधिकृत घोषणा ऑगस्ट २०२५ मध्ये होण्याची शक्यता आहे. कारण जून २०२५ चा CPI-IW (महागाई निर्देशांक) डेटा जुलै शेवट किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध होतो. त्यानंतर केंद्र सरकार कॅबिनेटच्या बैठकीत DA वाढीचा निर्णय जाहीर करेल.
मान्सूनचं आगमन लवकरच; 16 वर्षांनी इतिहासाची पुनरावृत्ती, पहा हवामान खात्याचा नवीन अंदाज..
महत्त्वाचं म्हणजे, ही वाढ जुलैपासून लागू केली जाणार असून, कर्मचाऱ्यांच्या पगारात जुलैपासूनचे DA चे वाढीव पैसेही जमा केले जातील. म्हणजे जुलै आणि ऑगस्टचे वेतन मिळताना जास्त रक्कम मिळण्याची शक्यता आहे.
काही व्हायरल मेसेजमध्ये असा दावा केला जात होता की, “निवृत्त कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळणार नाही”, मात्र हा मेसेज पूर्णपणे खोटा आहे. DA ही निवृत्त कर्मचाऱ्यांनाही दिली जाणारी रक्कम आहे आणि सरकार यामध्ये कोणताही बदल करत नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आधीच सातव्या वेतन आयोगानंतर DA ची वाढ ही वर्षातून दोनदा जानेवारी आणि जुलैमध्ये केली जाते. त्यामुळे या वेळच्या वाढीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
Disclaimer:
वरील माहिती विविध माध्यमांत प्रसिद्ध झालेल्या रिपोर्ट्स आणि अंदाजांवर आधारित आहे. महागाई भत्त्यात (DA) होणारी वाढ, तिची टक्केवारी आणि अंमलबजावणीची तारीख याबाबत अंतिम निर्णय केंद्र सरकारच्या अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होईल. कृपया कोणताही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना किंवा संबंधित विभागाच्या वेबसाईटवरून खात्री करून घ्या.
1 thought on “DA Hike July 2025: सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार, जुलैपासून महागाई भत्ता वाढणार!”