लोन घेतलंय? मग ही RBI ची नवी घोषणा तुमचं नशीब बदलू शकते!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RBI Credit Score Update | आजकाल प्रत्येकालाच एखाद्या टप्प्यावर लोन लागून येतं  मग ते घराचं असो, कारचं, शिक्षणाचं किंवा अगदी अडचणीच्या वेळेस घेतलेलं पर्सनल लोन. पण लोन घेताना किंवा फेडताना सगळ्यात महत्त्वाचं असतं तुमचं सिबिल स्कोअर. हाच स्कोअर बँक तुमच्या पात्रतेवर आधारित तुमचं लोन मंजूर करते किंवा नाकारते. मात्र आतापर्यंत एक मोठी अडचण होती  लोन फेडल्यावर सिबिल स्कोअर वेळेवर अपडेट होत नसे. RBI Credit Score Update

हे पण वाचा |  मोठी बातमी ! तुम्हाला आला का शेतकरी ओळखपत्र ID क्रमांक असं करा चेक 

RBI चा मोठा निर्णय: ग्राहकांना दिलासा!

भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) एक मोठा निर्णय घेतला असून, देशातील क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्यांवर (CICs) अधिक कडक देखरेख ठेवणार आहे. यामागे उद्दिष्ट एकच ग्राहकाला वेळेवर, अचूक आणि रिअल टाइम माहिती मिळावी.

आता याचा अर्थ काय?

तुम्ही जर लोन किंवा क्रेडिट कार्डाचं बिल वेळेवर भरलं, तर त्याची नोंद लगेच तुमच्या सिबिल स्कोअरमध्ये होणार! पूर्वी १५-२० दिवस लागायचे, तो त्रास आता जाणार.

सिबिल स्कोअर म्हणजे काय रे भाऊ?

हे म्हणजे तुमचं आर्थिक आरसाच!

तुम्ही किती वेळेवर पैसे भरता, कोणती लोनं घेतली आहेत, कर्ज किती आहे, बिलं किती वेळेवर दिली आहेत  हे सगळं यात नोंदवलं जातं. आणि त्यावरूनच बँक किंवा फायनान्स कंपनी ठरवते की तुम्हाला पुन्हा लोन द्यायचं की नाही.

ग्राहकांना शिक्षित करणार RBI चं मोठं पाऊल

RBI ने सर्व बँका आणि फायनान्स कंपन्यांना सांगितलं आहे की, त्यांनी जनजागृती मोहीम चालवावी. लोकांना सांगावं  सिबिल स्कोअर काय असतो, तो कसा सुधारता येतो, आणि तो खराब का होतो.

हे पण वाचा | सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटले अजित पवारांनी मान्य केलं चूक अदिती तटकरे म्हणाल्या  “मे महिन्याचा हप्ता लवकरच!”

उदाहरण द्यायचं झालं तर 

कधी कधी आपण ओला, उबरनं जातो, पण बिल भरायचं राहून जातं… किंवा ऑनलाईन खरेदी केल्यानंतर पेमेंट चुकतं… अशा छोट्या गोष्टीही तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम करतात!

RBI चं तंत्रज्ञानावर भर  ग्राहकांसाठी नवं युग सुरू

RBI चं म्हणणं आहे की, सगळी प्रणाली प्रगत तंत्रज्ञानावर आधारित असावी. त्यासाठी त्यांनी क्रेडिट कंपन्यांना टेक्नॉलॉजीमध्ये गुंतवणूक करायला सांगितलं आहे.

यात एक नवा मुद्दा समोर आलाय  युनिक ग्राहक ID तयार करणे. म्हणजेच, कोणाचा स्कोअर चुकून दुसऱ्याच्या नावावर जाऊ नये.

काय बदलणार आहे? जाणून घ्या फायदे 

✔️ वेळेवर पेमेंटची माहिती लगेच स्कोअरमध्ये

✔️ बँकांना अचूक डेटा  लोन मंजुरी लवकर

✔️ चुकीच्या रिपोर्टिंगची शक्यता कमी

✔️ ग्राहकांचा विश्वास वाढणार

✔️ कर्ज घेणं अधिक सोपं आणि पारदर्शक

आरबीआयचे स्पष्ट निर्देश

आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर एम. राजेश्वर राव यांनी यावर भाष्य करताना म्हटलं की “कर्ज देणं-घेणं हे पारदर्शक, कार्यक्षम आणि विश्वासार्ह असावं. ग्राहकांचं हित जपणं ही प्रत्येक क्रेडिट कंपनीची जबाबदारी आहे.”

Disclaimer:

वरील लेखामधील माहिती ही विविध माध्यमांतून मिळालेल्या बातम्या, अधिकृत घोषणा व आर्थिक तज्ज्ञांच्या अभिप्रायावर आधारित आहे. यामधील कोणतीही माहिती ही आर्थिक सल्ला म्हणून घेऊ नये. कर्ज घेण्याआधी किंवा आर्थिक निर्णय घेण्याआधी संबंधित अधिकृत संस्थेची खातरजमा करावी.

Leave a Comment